नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरू केलं आहे. याअंतर्गत जगातील देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी विशेष विमानं पाठवली जात आहेत. 3 जुलै ते 15 जुलै या दरम्यान एअर इंडियाकडून वंदे भारत मिशन -4 राबवण्यात येणार आहे. 17 देशातून 170 विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणले जाईल.
वंदे भारत मिशन - 4 अंतर्गत कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, बांगलादेश, थायलंड, दक्षिण अफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यामनार, जपान, युक्रेन, व्हिएतनाम आणि किर्गिस्तान या देशातून भारतीयांना आणले जाणार आहे.
170 विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. त्यामध्ये 38 फ्लाईट्स भारत- युके, 32 फ्लाईट्स भारत-यूएस, 26 फ्लाईट्स भारत- सौदी अरेबिया, असे उड्डाण भरतील. तर इतर फ्लाईट्स उर्वरीत देशातील भारतियांना आणतील.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 6 मेपासून वंदे भारत मिशन सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा तीसरा टप्पा पूर्ण झाला आहे. तिसऱ्या टपप्यात 550 आंतरराष्ट्रीय प्रवासाची विमान उड्डाणे झाली होती.