ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन : परदेशात अडकलेल्या 800 भारतीयांना आणले मायदेशी - परदेशात अडकलेले भारतीय माघारी

‘वंदे भारत - आशा आणि सुखाचे मिशन. दोहा, सॅन फ्रान्सिस्को, मेलबर्न आणि सिडनी येथून 2 मे 2020 रोजी चार विमाने दिल्ली, गया, कोची आणि अहमदाबाद येथे 833 भारतीय नागरिकांसह परतली,’ असे ट्विट पुरी यांनी सोमवारी केले.

vande bharat mission
वंदे भारत मिशन
author img

By

Published : May 26, 2020, 12:43 PM IST

नवी दिल्ली - वंदे भारत मिशनअंतर्गत सोमवारी दोहा, सॅन फ्रान्सिस्को, मेलबर्न आणि सिडनी येथून चार विमानांनी परदेशात अडकलेल्या 800 हून अधिक भारतीयांना देशात परत आणण्यात आले. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिली.

‘वंदे भारत - आशा आणि सुखाचे मिशन. दोहा, सॅन फ्रान्सिस्को, मेलबर्न आणि सिडनी येथून 2 मे 2020 रोजी चार विमाने दिल्ली, गया, कोची आणि अहमदाबाद येथे 833 भारतीय नागरिकांसह परतली,’ असे ट्विट पुरी यांनी सोमवारी केले.

केंद्र सरकारने वंदे भारत मिशनचा पहिला टप्पा 7 मे रोजी सुरू केला. याद्वारे कोरोनाविषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. याचा दुसरा टप्पा 16 मे रोजी सुरू झाला.

गेल्या आठवड्यात पुरी यांनी सांगितले होते की, आतापर्यंत 20 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना मिशन अंतर्गत देशात परत आणले गेले आहे. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढेल. या अभियानाचा दुसरा टप्पा 13 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) अलीकडेच जाहीर केले आहे.

'या अभियानाचा दुसरा टप्पा 16 मेपासून सुरू झाला. हा टप्पा 13 जूनपर्यंत चालेल. आम्ही या टप्प्यात 47 देशांतील नागरिकांना 162 विमानांद्वारे परत आणणार आहोत,' असे एमईएचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. यामध्ये इस्तंबूल, हो ची मिन्ह सिटी, लागोस आदी ठिकाणांसह अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणे वाढवत आहोत, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.