ETV Bharat / bharat

उत्तराखंड: सशस्त्र सीमा बलाने नेपाळी नागरिकांना कुंपण तयार करण्यापासून रोखले - सशस्त्र सीमा बल न्यूज

नेपाळी नागरिकांच्या हालचालींची माहिती मिळताच सशस्त्र सीमा बल आणि पोलीस तेथे दाखल झाले. नेपाळी नागरिकांना सीमेवरुन परत जाण्यास सांगितले. यानंतर नेपाळच्या नॅशनल आर्म पोलीस फोर्सचे जवान दाखल झाले. बराच वेळ समजवल्यानंतर ते नागरिक परत गेले.

SSB stop nepali cirizens
नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमा बलाने रोखले
author img

By

Published : Jul 23, 2020, 10:26 AM IST

खातिमा- भारत - नेपाळ सीमेवरील निर्मनुष्य भाग ठरवण्यात आलेल्या ठिकाणी अतिक्रमण करत कुंपण तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी नागरिकांना भारताच्या सशस्त्र सीमा बलाने रोखले. नेपाळी नागरिक मद्यधुंद अवस्थेत होते. सीमेवर असणाऱ्या 'पिलर क्रमांक 811' जवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

नेपाळी नागरिकांच्या हालचालींची माहिती मिळताच सशस्त्र सीमा बल आणि पोलीस तेथे दाखल झाले. नेपाळी नागरिकांना सीमेवरुन परत जाण्यास सांगितले. यानंतर नेपाळच्या नॅशनल आर्म पोलीस फोर्सचे जवान दाखल झाले. सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल आर्म पोलीस फोर्सने बराच वेळ समजवल्यानंतर ते नागरिक परत गेले. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सशस्त्र सीमा बल आणि नेपाळ नॅशनल आर्म पोलीस फोर्स यांच्यात बैठक होणार आहे.

'पिलर क्रमांक 811' जवळील भागवरुन भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरु आहेत. यामुळे हा भाग निर्मनुष्य म्हणून जाहीर केला आहे आणि या भागात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, नेपाळच्या रेडिओवरुन भारतविरोधी गाण्यांचे प्रसारण केले जातेय आणि सीमाभागातील गावे नेपाळच्या ताब्यात घ्यावीत अशा प्रकारचा अजेंडा राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी नॅशनल आर्म पोलीस फोर्सच्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक जखमी झाले होते. नेपाळने उत्तराखंडमधील कालापाणी,लिम्पियाधुरा,लिपुलेख त्यांच्या नकाशात दाखवले होते, याचा भारताने तीव्र विरोध केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.