ETV Bharat / bharat

कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी 2022 पर्यंत चालेल - अमेरिकन संशोधन

अ‌ॅलर्जी आणि संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय संस्थेचे संचालक अँथोनी फाऊन्सी यांनी कोरोना विषाणूची येऊ घातलेली 'दुसरी लाट' टाळता येणे शक्य नसल्याचे (अपरिहार्य असल्याचे) या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते.

Coronavirus
Coronavirus
author img

By

Published : May 2, 2020, 2:31 PM IST

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी 2022 पर्यंत सुरू राहू शकते. तसेच, जगातील बहुतांश लोकसंख्येला प्रतिबंधात्मक उपाय मिळून त्यांची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत झाल्याशिवाय या महामारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य आजार संशोधन केंद्राकडून याबाबतचा अहवाल समोर आला आहे.

'18 ते 24 महिने ही महामारी सुरू राहील. कारण, सामान्य लोकांच्या समूहात रोगप्रतिकार शक्ती हळूहळू वाढत जाते,' असे विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शन डिसीज रिसर्च अ‌ॅण्ड पॉलिसीमध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात लिहिले आहे.

काही महिन्यांपूर्वीच फ्लूसदृश साथीच्या आजारामुळे सुरू झालेल्या महामारीविषयी सांगताना त्यांनी हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. कोविड-19 ला कारणीभूत असलेला हा आजार आणखी दोन वर्षे पसरतच राहील. 60 ते 70 टक्के लोकसंख्या याला प्रतिकारक्षम होईपर्यंत हे होत राहील, असे 'हिल'ने नमूद केले आहे.

या आजाराचा इनक्युबेशन कालावधी (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष रोग होईपर्यंतचा काळ) जास्त आहे. यामुळे याचा R0 (एका रोग्याकडून इतर निरोगी व्यक्तींना लागण होण्याची क्षमता/शक्यता) जास्त आहे. हा आजार सामान्य फ्लूपेक्षा लवकर आणि सहजतेने पसरतो.

लस उपलब्ध नसणे किंवा मानवी समूहात प्रतिकारशक्ती नसणे यासारख्या अत्यंत वाईट परिस्थितीसाठी अमेरिकेने तयारी करावी अशी शिफारस संशोधकांनी केली. यासाठी आणि रोगानंतरच्या काळात समाजाच्या पुनर्उभआरणीसाठी सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांनी तयार रहावे, असे त्यांनी म्हटले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने आतापर्यंत 2 लाख 60 हजार बळी घेतले आहेत. तर, 32 दशलक्ष लोकांना याचा संसर्ग झाला आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा जगभरातील सरकारे इतक्या दिवसांपासून लोकांवर घातलेले प्रतिबंध, लॉकडाऊन शिथिल करण्याच्या विचारात आहेत.

अ‌ॅलर्जी आणि संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय संस्थेचे संचालक अँथोनी फाऊन्सी यांनी कोरोना विषाणूची येऊ घातलेली 'दुसरी लाट' (पुन्हा होणारा उद्भव) टाळता येणे शक्य नसल्याचे (अपरिहार्य असल्याचे) या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते. कारण, हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून संपूर्ण जगभरात पसरला आहे, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.