नवी दिल्ली - वय हा फक्त आकडा, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा मनात असेल. तर तुम्ही काहीही प्राप्त करू शकता, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमधील एका 50 वर्षीय महिलेने राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) पास केली आहे. अलका बाजपेयी असे महिलेचे नाव आहे. त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झाली असून त्यांना दोन मुलीदेखील आहेत.
अलका बाजपेयी यांनी यापूर्वीही दोनदा परिक्षा दिली होती. मात्र, त्यांना यश आले नव्हते. मात्र, यावेळी आपल्याला परिक्षा पास करायची आहे, हे त्यांनी मनाशी निश्चित केलं होतं. त्यांच्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी नीट परिक्षा पास केली आहे. तर दुसरी मुलगी पीएचडीचा अभ्यास करत आहे. अलका यांचा संघर्ष त्यांच्या गावातल्या अनेक लोकांसाठी प्रेरणादायक असून त्यांनी महिला सबलीकरणासाठी एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मी महात्मा गांधी यांच्या तत्वाचे पालन केले. साधी राहणीमान, उच्च विचारसरणीवर माझा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
माझे पती संशोधक असून ते नेहमीच गांधी आणि त्यांच्या तत्वांबद्दल सांगतात. त्यामुळे मी गांधीविषयी पुस्तके वाचण्यास सुरवात केली. दोन मुली असल्यामुळे मला वेळेचे नियोजन करणे, थोडे अवघड गेले. 2009 मध्ये मानशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर मी ब्रेक घेतला. मात्र, जेव्हा माझ्या मुली शिक्षणासाठी बाहेर गेल्या. तेव्हा पुन्हा 2018 मध्ये अभ्यास सुरू केला. शिक्षण घेण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी मला नेहमीच पाठबळ दिलं, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - हरयाणाध्ये राजकीय भूकंप...दुष्यंत चौटालांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट