ETV Bharat / bharat

Coronavirus : उत्तर प्रदेश सरकारने हँड सॅनिटायझरचे उत्पादन वाढवले..

author img

By

Published : Apr 3, 2020, 6:46 PM IST

राज्य सरकारच्या सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या होत असलेले सॅनिटायझरचे उत्पादन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून होत असलेली मागणी यात बरीच तफावत आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा करण्यासाठी आता राज्य सरकारने कंबर कसली आहे.

UP increases production of hand sanitizers to meet demand
Coronavirus : उत्तर प्रदेश सरकारने हँड सॅनिटायझरचे उत्पादन वाढवले..

लखनऊ - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात हँड सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हँड सॅनिटायझरचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या दररोज सुमारे साठ हजार लीटर हँड सॅनिटायझरचे उत्पादन होत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्य सरकारच्या सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या होत असलेले सॅनिटायझरचे उत्पादन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून होत असलेली मागणी यात बरीच तफावत आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा करण्यासाठी आता राज्य सरकारने कंबर कसली आहे.

राज्य सरकारने हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी ५२ नवे परवाने दिले आहेत. यामध्ये २१ साखर कारखाने, ९ डिस्टिलरी आणि २२ नव्या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. यासोबतच, सॅनिटायझरच्या २०० मिलीलिटरच्या पाकिटासाठी १०० रुपयांहून अधिक दर आकारू नयेत असे आदेश राज्यातील सर्व सॅनिटायझर बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी देशातील रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरामध्ये महाराष्ट्रात ८१ नवे रुग्ण आढळून आले. देशात सध्या कोरोनाचे एकूण २,३०१ रुग्ण आहेत. यांपैकी २,०८८ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा : तामिळनाडूत कोरोनाग्रस्तांचा आकडा 411 वर, दिवसभरात 102 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.