लखनऊ - उत्तर प्रदेशात वाढत चाललेल्या हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमधील प्रदूषणात मागील दिवाळीनंतर वेगाने वाढ झाली आहे, त्या शहरांमध्ये दिल्लीप्रमाणे 'ऑड-इव्हन' फॉर्म्युला लागू केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशचे वन आणि पर्यावरण मंत्री दारा सिंह चौहान यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत याआधीच चर्चा झाली होती, त्यानुसार पोलीस प्रशासनाला आदेश दिले गेले आहेत, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर हा नियम कधीपासून लागू करायचा हे ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी लोकांनाही आपापल्या परीने प्रदूषणाला आळा घालण्याचे आवाहन केले. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाचट जाळू नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात कचरा जाळणाऱ्यांकडून आतापर्यंत साधारणपणे २ लाखांपर्यंत दंड वसूल केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पहिल्याच दिवशी भाजप खासदाराने मोडला दिल्लीतील सम-विषम नियम