ETV Bharat / bharat

काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब', सोनिया गांधींना कुटूंबाच्या मोहातून बाहेर येण्याचा सल्ला

author img

By

Published : Sep 6, 2020, 8:19 PM IST

या पत्रातून उत्तर प्रदेशाच्या प्रभारी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या चार पानांच्या पत्रात सोनिया गांधी यांना स्वकुटुंबाच्या मोहातून बाहेर पडण्याचा आणि त्याच्या पलिकडे जाऊन पक्षाच्या विचार करण्याचा आग्रह केला आहे. कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडून पक्षाच्या लोकशाहीपूर्ण परंपरांना पुनर्स्थापित करावे, असे या पत्रात लिहिले आहे.

काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब'
काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब'

लखनऊ - काँग्रेसमध्ये आणखी एक 'लेटर बॉम्ब' येऊन पडला आहे. हे पत्र उत्तर प्रदेशातून आले आहे. मागील वर्षी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नऊ वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये पक्ष केवळ 'इतिहास'चा भाग बनून राहण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे यात सुचवण्यात आले आहे. परिवाराच्या मोहातून बाहेर येण्याचा सल्लाही यामध्ये देण्यात आला आहे.

या पत्रातून उत्तर प्रदेशाच्या प्रभारी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या चार पानांच्या पत्रात सोनिया गांधी यांना स्वकुटुंबाच्या मोहातून बाहेर पडण्याचा आणि त्याच्या पलीजाऊन पक्षाच्या विचार करण्याचा आग्रह केला आहे. कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडून पक्षाच्या लोकशाहीपूर्ण परंपरांना पुनर्स्थापित करावे, असे या पत्रात लिहिले आहे.

माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी विधायक विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांच्या सह्यांचे हे पत्र असून यामध्ये काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्वांत वाईट काळातून जात असल्याचे म्हटले आहे.

'तुम्हाला राज्यांच्या बाबतीत प्रभारींकडून सद्यस्थितीची माहिती दिली जात नाही. आम्ही जवळजवळ एका वर्षापूर्वीपासून तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत होतो. मात्र, आम्हाला ती मिळत नव्हती. आमची हकालपट्टी अवैध होती. त्याविरोधात आम्ही अपील केली होती. मात्र, केंद्रीय अनुशासन समितीलाही त्यावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही,' असे पत्रात म्हटले आहे.

'पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर अशा लोकांनी कब्जा केला आहे, जे वेतनावर काम करत आहेत. ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत,' असा दावा काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. 'या नेत्याला पक्षाच्या विचारधारेविषयी काही माहिती नाही. मात्र, त्यांच्याकडे उत्तर प्रदेशात पक्षाला दिशा देण्याचे काम सोपवले आहे,' असे यात पुढे म्हटले आहे.

'हे लोक अशा नेत्यांच्या कामगिरीचे परीक्षण करत आहेत, जे 1977-80 च्या संकटात काँग्रेससोबत पाय रोवून उभे राहिले. सध्या पक्षात लोकशाहीच्या मानदंडांना पायदळी तुडवण्यात येत आहे आणि वरिष्ठ नेत्यांना निशाणा बनवले जात आहे. अपमानित केले जात आहे आणि काढून टाकले जात आहे. वास्तविक, आम्हाला आमच्या हकालपट्टीविषयी मीडियाकडून समजले होते. ही बात राज्याच्या मापनश्रेणीत नवीनच कार्यसंस्कृती आहे,' असे पत्रात म्हटले आहे.

नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांदरम्यान संवाद नाही, असाही आरोप या पत्रात केला आहे.

उत्तर प्रदेशात एनएसयूआय आणि युवा काँग्रेस सदस्य निष्क्रिय होत आहेत, असे यात म्हटले आहे.

पक्षात गटबाजी, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व बाबींवर वेळीच विचार करून त्या सोडवल्या नाहीत तर, पक्षाचे भवितव्य अंधारात असेल आणि पक्ष इतिहासजमा होण्याचा धोका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.