ETV Bharat / bharat

तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती; जैशच्या संशयित दहशतवाद्यांची कबुली - terrorists

हे दोघे बनावट क्रमांकांच्या आधारे ही भरती करत होते. हे क्रमांक पोलिसांना मिळाले असून त्यांच्यावरील माहितीचे विश्लेषण सुरू आहे.

शाहनवाज आणि अकिब
author img

By

Published : Mar 6, 2019, 12:55 PM IST

लखनौ - मागील महिन्यात अटक करण्यात आलेले जैशचे संशयित दहशतवादी शाहनवाज आणि अकिब यांनी तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करत असल्याचे कबूल केले आहे. त्यांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने अटक केली होती.

हे दोघे बनावट क्रमांकांच्या आधारे ही भरती करत होते. हे क्रमांक पोलिसांना मिळाले असून त्यांच्यावरील माहितीचे विश्लेषण सुरू आहे. या दोघांच्या व्हॉटस अॅप चॅटवरील आणि ब्लॅकबेरी मेसेंजरवरील माहितीतून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघेही व्हॉटस अॅपचा थेट वापर करत नसून ते व्हॉटस अॅप जीबी या 'थर्ड पार्टी अॅप्लीकेशन'चा वापर करत होते.

'हे दोघे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी नवीन तरुणांची भरती करत होते, हे समोर आले आहे. यापैकी शाहनवाज हा ग्रेनेडमधील तज्ज्ञ समजला जातो. त्यांच्या अधिक चौकशीसाठी कोठडीची (ट्रान्झिट रिमांड) मागणी करण्यात आली आहे,' असे राज्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

Intro:Body:

up ats says jem suspected terrorists confess recruiting youths 

तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती; जैशच्या संशयित दहशतवाद्यांची कबुली

लखनौ - मागील महिन्यात अटक करण्यात आलेले जैशचे संशयित दहशतवादी शाहनवाज आणि अकिब यांनी तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करत असल्याचे कबूल केले आहे. त्यांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने अटक केली होती.

या दोघांकडून बनावट क्रमांकांच्या आधारे हे ही भरती करत होते. हे क्रमांक पोलिसांना मिळाले असून त्यांच्यावरील माहितीचे विश्लेषण सुरू आहे. या दोघांच्या व्हॉटस अॅप चॅटवरील आणि ब्लॅकबेरी मेसेंजरवरील माहितीतून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघेही व्हॉटस अॅपचा थेट वापर करत नसून ते व्हॉटस अॅप जीबी या 'थर्ड पार्टी अॅप्लीकेशन'चा वापर करत होते.

'हे दोघे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी नवीन तरुणांची भरती करत होते, हे समोर आले आहे. यापैकी शाहनवाज हा ग्रेनेडमधील तज्ज्ञ समजला जातो. त्यांच्या अधिक चौकशीसाठी कोठडीची (ट्रान्झिट रिमांड) मागणी करण्यात आली आहे,' असे राज्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.