श्रीनगर - शोपियानमधून प्रादेशित लष्कराचा (टीए) शिपाई शकीर मंजूर बेपत्ता झाला होता. याच्या एका आठवड्यानंतर एक असत्यापित ऑडिओ मेसेज समोर आला आहे. यामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने आपण स्वतः दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. या सैनिकाच्या अपहरण आणि हत्येची जबाबदारी घेतल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी या शिपायाचे कपडे एका सफरचंदाच्या बागेत सापडले होते. यानंतर सुरक्षा दलाने त्यांचे शोधकार्य अधिक तीव्र केले.
रायफलमन शाकीर मंजूर सोमवारी बेपत्ता झाला होता. तो त्याच्या कुटुंबीयांसह ईदची सुट्टी घालवून परत कर्तव्यावर हजर होण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. तसेच, अपहरणकर्त्यांनी शिपायाचे खासगी वाहन पेटवून दिले. तो दक्षिण काश्मीरमध्ये टीएच्या 162 बटालियनमध्ये काम करणारा सैनिक होता.