नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. देशातील 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी 12 प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशभरामध्ये 15 हजार तपासणी सेंटर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. चंदीगढ, दिल्ली, गोवा, जम्मू काश्मीर, नागालॅड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपूरा, तेलंगाणा, छत्तीसगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
देशात 415 कोरोनाबाधित रुग्णाची संख्या असून कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.