नवी दिल्ली - ब्रिटिश उच्चायुक्तालयाने संयुक्त राष्ट्रांकडून लवकरच मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जाऊ शकते, असे म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानकडूनही तेथील दहशतवाद्यांवर ठोस कारवाई केली जाऊ शकते, असे म्हटले आहे. ब्रिटिश उच्चायुक्ताचे डोमनिक एस्कीथ यांनी पुलवामा हल्ल्यानंतर आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयी देखील चर्चा केली.
भारत-पाकिस्तानच्या दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने महत्त्वाची भूमिका निभावल्याचे त्यांनी म्हटले आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या विरोधात चीन वारंवार भूमिका घेत आहे. याविषयी त्यांनी चीनच्या प्रतिक्रियेची वाट पाहात असल्याचे सांगितले. याच वर्षी चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये चौथ्यांदा भारतविरोधी भूमिका घेतली होती. यावर लवकरच तोडगा निघेल, असे ते म्हणाले.