ETV Bharat / bharat

अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश - AMIT SHA

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती कमळ घेतले.

उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ
author img

By

Published : Sep 14, 2019, 9:43 AM IST

Updated : Sep 14, 2019, 2:13 PM IST

नवी दिल्ली - साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती कमळ घेतले. नवी दिल्लीत त्यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे चर्चेत होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा रंगत होत्या. आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत अखेर हाती कमळ घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते उपस्थित होते.

अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ'

शिवरायांचे विचार पुढे घेऊनच भाजपची वाटचाल - उदयनराजे
छत्रपती शिवाजी महारांजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला आहे. त्या आदर्शावर आपली लोकशाही चालत आहे. त्यांच्या अष्टप्रधान मंडळावर अधारलेली सत्ता आहे. शिवरायांचे विचार घेऊनच भाजप पुढे जात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. प्रत्येक राज्यात विकास होत आहे. त्यामुळेच अनेकजन भारतीय जनता पक्षात येत आहेत. काश्मीरप्रश्नी पहिल्यांदाच भाजपने मोठे पाऊल उचलले आहे. देशाच्या अंखडतेसाठी हे गरजेचे असल्याचेही उदयनराजे म्हणाले.

जनता भाजपमध्ये कोणाच्या सांगण्यावरून जोडली जात नाही तर ती त्यांच्या विचारसरणीमुळे पक्षात येत आहे. त्याचप्रमाणे मीही भाजपमध्ये प्रवेश केला. निस्वार्थीपणे मी जनहितासाठी ३ महिन्यात खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही उदयनराजे म्हणाले. मी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबत मिळून काम करेन असेही उदयनराजे म्हणाले.

शिवरायांच्या वंशातले राजे भाजपमध्ये आल्याचा आनंद - अमित शाह
शिवछत्रपती यांनी स्वराज्यासाठी एक संघर्ष सुरू केला आणि हिंदवी स्वराजाची स्थापना केली. त्यांचेच वंशज आज भाजपमध्ये दाखल होत असल्याचा आनंद होत असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. आज मी तमाम भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने राजेंचे स्वागत करतो. भाजप जनसंघ असल्यापासून शिवरायांच्या विचारांवर चालत असल्याचेही शाह म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल येतील. महाराष्ट्राचे गौरव पुन्हा मिळवून देण्याचे काम फडणवीस सरकार करेल. विधानसभेला आम्ही ३/4 जागांनी विजयी होऊ असा विश्वासही यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला.

राजेंच्या प्रवेशाने भाजपला मोठी युवाशक्ती मिळाली - मुख्यमंत्री
छत्रपती शिवरायांचे नाव येताच देशात त्यांच्या आदर्शाची चर्चा केली जाते. त्याचप्रमाणे उदयनराजे हेही आहेत. उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून आज भाजपमध्ये प्रवेश केला. काश्मीर प्रश्नाची राजेंनी प्रशंसा केली. मोदी जर देश एकसंध करण्याचे काम करत असतील तर छत्रपती शिवरायांचे वंशज त्यांना पाठिंबा का देणार नाहीत, असे म्हणत त्यांनी उदयनराजेंचे स्वागत केले. राजेंच्या मागे युवाशक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठी युवा शक्ती मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोंदींनी रायगडावर शिवरायांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारावर सत्ता चालवली असल्याचेही ते म्हणाले.

उदयनराजेंचा राजकीय प्रवास
१) 1996 ला उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभा निवडूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला.
२) 1998 ला शिवेंद्रराजे यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे लोकसभेत गेल्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचा पराभव केला. गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे त्यांना महसूलमंत्री पद मिळालं.
३) 1999 च्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंचा पराभव केला.
४) 1999 ला शरद लेवे खून प्रकरणात उदयनराजे यांना अटक झाली
५) 2002 साली उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
६) 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंचा पराभव केला.
७) 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभा लढवली आणि निवडून आले.
८) 2014 आणि 2019 मध्येही राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली आणि निवडून आले.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.