श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये बुधवारी सकाळी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जिल्ह्याच्या सगुन भागामध्ये सुरू असलेल्या चकमकीत ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सगुन भागामध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली होती. या भागात दहशतवादी लपले असल्याच्या माहितीवरुन ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यास दहशतवाद्यांनी नकार दर्शवल्यामुळे सुरक्षा दलांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
यानंतर झालेल्या जोरदार गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही शोधमोहीम संपली असून, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : काश्मिरात भाजप कार्यकर्त्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार