बंगळुरू - राज्यामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशभरामध्ये कोरोनाचे ११० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
एक २० वर्षीय महिला इंग्लडमधून भारतात परतली होती, तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच एका साठ वर्षीय व्यक्तीलाही लागण झाल्याचे निदान झाले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका कोरोगाग्रस्ताच मृत्यू झाला होता, त्याचा संपर्कात ही व्यक्ती आली होती. दोघांनीही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
Karnataka Health Department: 2 new confirmed cases of COVID-19; Total 10 positive cases in the State pic.twitter.com/PQbPmFp7ys
— ANI (@ANI) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Karnataka Health Department: 2 new confirmed cases of COVID-19; Total 10 positive cases in the State pic.twitter.com/PQbPmFp7ys
— ANI (@ANI) March 17, 2020Karnataka Health Department: 2 new confirmed cases of COVID-19; Total 10 positive cases in the State pic.twitter.com/PQbPmFp7ys
— ANI (@ANI) March 17, 2020
त्यामुळे राज्यसरकारांसह केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. शाळा महाविद्यालयांसह चित्रपटगृहे, मॉल, नाट्य़गृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आल्या आहेत. गरज नसेल तर प्रवास टाळवा. आरोग्यााची काळजी घ्यावी. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास तत्काळ रुग्णालयात जाण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्रामध्ये ३९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.आरोग्य मंत्रालयाने 24 तास उपलब्ध असलेला 011 - 239780-46 हा दूरध्वनी मदत क्रमांक सुरू केला आहे. तसेच नागरिक 104 या क्रमांकावर आणि ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही संपर्क साधू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.महाराष्ट्रातही नागरिक कोरोनाविषयक मदतीसाठी 020 - 26137394 या राज्यस्तरीय तसंच मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क करू शकतात.