श्रीनगर - कुलगाम जिल्ह्यातील चिंगाम प्रांतात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या ठिकाणी हल्लेखोर लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. यावेळी उडालेल्या चकमकीत दोन दहशकवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. चिंगाम प्रांतात अद्याप शोधमोहिम सुरू असून काही परिसर सुरक्षा यंत्रणांनी सील केला आहे. तसेच अद्याप चकमक सुरू आहे.
-
#KulgamEncounterUpdate: 02 #unidentified #terrorists killed. Operation in progress. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/Y9kDH4uh5V
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) October 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#KulgamEncounterUpdate: 02 #unidentified #terrorists killed. Operation in progress. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/Y9kDH4uh5V
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) October 10, 2020#KulgamEncounterUpdate: 02 #unidentified #terrorists killed. Operation in progress. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/Y9kDH4uh5V
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) October 10, 2020
काश्मीर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. संबंधित ट्विटनुसार अद्याप सुरू असलेल्या चकमकीत दोन हल्लेखोर ठार झाले आहेत. त्यांची ओखळ अद्याप पटलेली नाही. तसेच या भागात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
चिंगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानुसार स्थानिक पातळीवर शोधमोहिम हाती घेण्यात आली. संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलाच्या उपस्थितीची जाणीव झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा रक्षकांनी दोघांना कंठस्नान घातले.
दरम्यान, बुधवारी (7ऑक्टोबर) रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. ही चकमक दक्षिण काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात झाली होती. मंगळवारी सुरू झालेल्या या चकमकीत दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.