ETV Bharat / bharat

श्रीनगरजवळ दोन अतिरेक्यांचा सुरक्षा दलांकडून खात्मा

author img

By

Published : Jul 25, 2020, 11:56 AM IST

रणबीरगड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने पहाटे शोधमोहीम सुरू केली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना ठार केले. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली

Security forces killed two terrorist
सुरक्षा दलांकडून दोन अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या सरहद्दीवर आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रणबीरगड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने पहाटे शोधमोहीम सुरू केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला.या हल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी भारतीय लष्कराच्या 38 राष्ट्रीय रायफल्ससमवेत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे उद्धवस्त केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने थानामंडी भागात शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या अतिरेक्यांशी चकमक झाली. पोलीस आणि लष्कराच्या थानामंडी येथील 38 राष्ट्रीय रायफल्सनी मन्याल भागात सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान चकमक झाली होती.

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील नागनाद-चिम्मर भागात चकमकीत जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी गटातील तीन दहशतवादी ठार झाले होते, तर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.