ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशातील अपघातात दोन स्थलांतरीत कामगार ठार, 14 जखमी

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात परप्रांतीय मजुरांनी भरलेल्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

author img

By

Published : May 15, 2020, 9:50 AM IST

Uttar Pradesh road accident
Uttar Pradesh road accident

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात एका ट्रकची गाडीला धडक बसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार आणि 14 जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

परप्रांतीय मजुरांनी भरलेल्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमधून 46 मजूर प्रवास करत होते.

गुरुवारी उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर- सहारनपूर महामार्गावरुन बिहारला पायी घरी जाणाऱ्या मजूरांना वेगवान बसने चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत ६ मजूरांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले होते.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजूर आपल्या घराच्या ओढीनं प्रवास करत आहेत. इतर राज्यातून येणारे स्थलांतरित कामगार सतत अपघातांना बळी पडत असल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.