श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान दोन सैनिकांना वीरमरण आले आहे. ही घटना काश्मीरमधील राजुरी जिल्ह्यामध्ये घडली.
-
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
हेही वाचा - 'पाकने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर भारताकडे 'स्ट्राईक' अधिकार'
सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांनी हा हल्ला केला. खारी तरायत जंगलातून भारतामध्ये काहीजण घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार लष्कराने परिसराला वेढा घातला होता, आणि शोधमोहीम हाती घेतली होती. याबाबत सविस्तर माहिती हाती आली नसल्याचे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले.
हेही वाचा - मणिपूरमध्ये चार दहशतवादी ताब्यात..
शोध मोहीम सुरू असताना घुरखोरांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या परिसरात लष्कराने मोठे अभियान राबवले आहे.