ETV Bharat / bharat

जयपूर-महाराष्ट्राच्या तरुणींनी केला विवाह; फेसबुकवरुन झाली होती मैत्री - राजस्थान-महाराष्ट्र तरुणी विवाह

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या या तरुणीची महाराष्ट्रातील तरुणीशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर, महाराष्ट्रातील या तरुणीने जयपूरला जात, आपल्या मैत्रिणीला महाराष्ट्रात आणले. इथे या दोघींनी लग्न केले.

rajasthan marriage
फेसबुकवरुन झाली होती मैत्री, मग केला विवाह; महाराष्ट्र आणि जयपूरच्या तरुणींची कथा..
author img

By

Published : Dec 31, 2020, 9:21 PM IST

जयपूर : महाराष्ट्रात पार पडलेला एक विवाह सध्या जयपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. जयपूरमधील एका मुलीने पळून येऊन महाराष्ट्रातील मंदिरात विवाह केला. मात्र, तिच्या पळून जाण्यामुळे हा विवाह चर्चेत नाही आला. तो चर्चेत आलाय, कारण तिने कोणा तरुणाशी नाही, तर एका तरुणीशी लग्न केले आहे. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून, जयपूर पोलिसांनी दोन्ही तरुणींना महाराष्ट्रातून ताब्यात घेतले आहे.

फेसबुकवर झाली ओळख..

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या या तरुणीची महाराष्ट्रातील तरुणीशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर, महाराष्ट्रातील या तरुणीने जयपूरला जात, आपल्या मैत्रिणीला महाराष्ट्रात आणले. इथे या दोघींनी लग्न केले.

बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना समोर आला प्रकार..

तिकडे जयपूरमध्ये या तरुणीच्या कुटुंबीयांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या मुलीचा तपास घेत असता जयपूर पोलिसांना या सर्व प्रकाराबाबत माहिती समजली. पोलिसांनी यानंतर दोघींनाही जयपूरला आणत, जयपूरमधील मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील तरुणीचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. तर, महाराष्ट्रातील तरुणी नागपूरची रहिवासी असून, ती गडचिरोलीमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. यानंतर दोघींनाही एकत्र रहायचे असल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.