मुंबई : देशभरातील लाखो आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोविड-19 विरोधात प्रत्यक्ष लढा देत आहेत. या कोरोना वॉरियर्सला परवा (रविवारी) देशाच्या तीन्ही दलांनी आकाशातून पुष्पवृष्टी करत मानवंदना दिली. यानंतर आता या योद्ध्यांना छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अनेक कलाकांनी देखील अनोखी मानवंदना दिली आहे.
हेही वाचा... मुंबईत मद्यविक्रीला परवानगी; पण 'या' नियमांसह, जाणून घ्या...
एक उम्मीद...
हितेन तेजवानी, जैन इमाम, शक्ती अरोरा, नमित खन्ना, सारा खान, शमा सिकंदर आणि विशाल सिंग यांसारख्या कलाकारांनी 'एक उम्मीद' या व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. हृदय गट्टानी, शिवांगी भयाना आणि आशा सिंह या गायकांनी हे गाणे गायले आहे. तर याची रचना चंदन सक्सेना यांनी केली असून अभिषेक देब यांनी गीत लिहिले आहे.
अभिनेता-निर्देशक असलम खान यांच्या देखरेखीखाली हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यांनी याबाबत बोलताना, 'जेव्हा आपण सर्वजण घरात निवांत बसलो आहोत, तेव्हा हे कोरोना योद्धे आपल्याला सुरक्षित करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे' असे म्हटले आहे.