श्रीनगर - भारत-पाकिस्तान सीमेवरील सांबा जिल्ह्यातून 150 मीटर लांबीचा बोगदा असल्याचे बीएसफला आढळले आहे. या बोगद्यातूनच चार दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली असावी, अशी शंका जम्मू-कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीच्या तपासादरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील नगरोटाजवळ हा बोगदा आढळला, असेही ते म्हणाले.
चार दहशतवाद्यांची बोगद्यामार्गे घुसखोरी
गुरुवारी पहाटे पाच वाजता जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले होते. यात जैशचे चार दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके अॅसाल्ट रायफल, तीन पिस्तुल, 29 ग्रेनेड आणि सहा यूबीजीएल ग्रेनेड्ससह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये शिरण्यासाठी या बोगद्याचा वापर केला असल्याचा संशय आहे
मोठा शस्त्रसाठा जप्त
पोलिसांनी हल्ला झालेल्या परिसरातील महत्त्वाची माहिती बीएसएफला पुरवली त्यानंतर हे भुयार शोधून काढले, असे सिंग यांनी सांगितले. जैशचे दहशतवादी पाकिस्तानातून भारतात शिरुन महामार्गावरील ट्रकमध्ये कसे काय चढले याचा तपास सुरु होता. दरम्यान बीएसएफला ऑगस्टमहिन्यात असाच एक बोगदा सापडला होता. त्याच बोगद्या शेजारी नवीन बोगदा तयार केल्याचे उघडकीस आले आहे.
पाकिस्तानचीच मदत
या हल्ल्यांसाठी पाकिस्तान केवळ लष्कर-ए-तोयबा आणि जैशलाच नव्हे तर हिजबुल मुजाहिद्दीन आणि अल-बद्र या दहशतवादी संस्थांना देखील शस्त्रास्त्र आणि त्यांची तस्करी करण्यासाठी मदत करत असल्याचे पुरावे देखील दिल्याचे सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा - वाढीव वीजबिल : भाजपा, मनसेच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन
हेही वाचा - मुलाने पळून केलं लग्न, आईला निर्वस्त्र करून मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण