", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3924295-thumbnail-3x2-kn.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3924295-thumbnail-3x2-kn.jpg" } } }
", "articleSection": "bharat", "articleBody": "मंगळवारी विधानसभेत बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस)च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला.बंगळुरू - विधानसभेत बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस) च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर अखेर पडदा पडला असून कुमारस्वामींचे सरकार कोसळले आहे.LIVE UPDATES : कुमारस्वामी आणि जी परमेश्वरा यांनी विधानसभा अध्यक्ष के. आर रमेशकुमार यांची भेट घेतली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करणार. यानंतर, मी राज्यपालांची भेट घेणार आहे - बीएस येदियुरप्पा यांची प्रतिक्रिया भाजपकडून चालू असलेल्या या घाणेरड्या राजकारणाविरोधात काँग्रेस देशभरात लढा देणार आहे - काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल केंद्र सरकार, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भाजपने घाणेरडे राजकारण करत आज कर्नाटकातील सरकार पाडले - काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल यांची प्रतिक्रिया राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामींचा राजीनामा मंजूर केला. एच. डी कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे राजीनामा दिला. Karnataka Governor, Vajubhai Vala accepts HD Kumaraswamy's resignation. pic.twitter.com/AVuD082In4— ANI (@ANI) July 23, 2019 व्हिप जारी केल्यानंतरही बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहिलेल्या बसप आमदार एन. महेश यांची पक्षातून हकालपट्टी - मायावती काँग्रेसने बहुमत चाचणीसाठी व्हिप जारी केला होता. आज (मंगळवार) बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. कायद्यानुसार अनुपस्थित राहिलेले आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते - सिद्धरामय्या कुमारस्वामी राजभवनात पोहचले. सरकार पडल्यानंतर निराश झालेल्या कुमारस्वामींनी विधानसभा सभागृह सोडले. बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारण्यात आले नाहीत. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करायचा किंवा नाही, हे सर्वस्वी आमदारांवर अवलंबून आहे. भाजपकडे सद्या १०५ जागांचे बहुमत असून आम्ही स्थिर सरकार स्थापन करणार आहोत - भाजप नेते जगदीश शेट्टर भाजप उद्या सरकार स्थापनेचा दावा करणार कर्नाटकात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या समस्येकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी आम्ही लवकरात निर्णय घेणार आहोत - बीएस येदियुरप्पा हा लोकशाहीचा विजय आहे. कर्नाटकचे नागरिक कुमारस्वामी सरकारला कंटाळले होते. मी राज्याच्या नागरिकांना आश्वासित करतो, की येणारा काळ फक्त विकासाचा असेल - बीएस येदियुरप्पा आम्ही आज विधानसभेत बहुमत चाचणीत अपयशी ठरलो. राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामा देणार आहे - एच. डी कुमारस्वामी आमचा पराभव हा पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या विश्वासघातामुळे झाला आहे. आम्ही या काळात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मी कर्नाटकाचा नागरिक आहे आणि मला काँग्रेस पक्षात अशाप्रकारे झालेला विश्वासघात अजिबात आवडला नाही - कांग्रेस नेते एच. के पाटील यांची प्रतिक्रिया बीएस येदियुरप्पा आणि भाजप आमदारांचा विधानसभेत जल्लोष कांग्रेस-जेडी(एस)ला ९९ आमदारांचे पाठबळ तर, भाजपकडे १०५ आमदार. बहुमत चाचणीत १०३ चा बहुमत आकडा गाठण्यात काँग्रेस-जेडी(एस) ला अपयश, कुमारस्वामी सरकार पडले.कुमारस्वामी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची तिसरी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांबाबत निर्णय दिल्याशिवाय या ठरावावर मतदान घेऊ नये, असा आग्रह काँग्रेसच्या सदस्यांनी धरला. यामुळे आज (मंगळवार) विधानसभा अध्यक्षांनी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला.गोंधळामुळे कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी सोमवारीच मतदान पार पडावे यासाठी प्रयत्न केला होता. ठरावावरील मतदान लांबवणे हा या सभागृहाचा तसेच माझा अवमान ठरेल, असे मत त्यांनी मांडले होते. मात्र, तरीही सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे आज (मंगळवार) सकाळी १ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले होते.दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) ४ वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले. त्यानंतर ६ वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण होईल, असे रमेशकुमार यांनी स्पष्ट केले होते. कर्नाटक राज्य विधानसभेत एकूण २२५ सदस्यसंख्या आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला ११३ पेक्षा अधिक सदस्यसंख्या असणे आवश्यक होते. परंतु, १६ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमताचा आकडा १०३ वर आला होता. मतमोजणी झाल्यानंतर भाजपच्या बाजूने १०५ तर, काँग्रेस-जेडी(एस) चे ९९ आमदार होते.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/trust-vote-at-karnataka-assembly/mh20190723195514702", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-07-23T19:55:19+05:30", "dateModified": "2019-07-24T02:15:15+05:30", "dateCreated": "2019-07-23T19:55:19+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3924295-thumbnail-3x2-kn.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/trust-vote-at-karnataka-assembly/mh20190723195514702", "name": "कर'नाटका'चा पहिला अंक संपला; मोदी आणि शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार - येदियुरप्पा", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3924295-thumbnail-3x2-kn.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3924295-thumbnail-3x2-kn.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / bharat

कर'नाटका'चा पहिला अंक संपला; मोदी आणि शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार - येदियुरप्पा - बहुमत

मंगळवारी विधानसभेत बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस)च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला.

कर'नाटका'त अखेर कुमारस्वामी सरकार कोसळले
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:55 PM IST

Updated : Jul 24, 2019, 2:15 AM IST

बंगळुरू - विधानसभेत बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस) च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर अखेर पडदा पडला असून कुमारस्वामींचे सरकार कोसळले आहे.

LIVE UPDATES :

  • कुमारस्वामी आणि जी परमेश्वरा यांनी विधानसभा अध्यक्ष के. आर रमेशकुमार यांची भेट घेतली.
  • मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करणार. यानंतर, मी राज्यपालांची भेट घेणार आहे - बीएस येदियुरप्पा यांची प्रतिक्रिया
  • भाजपकडून चालू असलेल्या या घाणेरड्या राजकारणाविरोधात काँग्रेस देशभरात लढा देणार आहे - काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल
  • केंद्र सरकार, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भाजपने घाणेरडे राजकारण करत आज कर्नाटकातील सरकार पाडले - काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल यांची प्रतिक्रिया
  • राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामींचा राजीनामा मंजूर केला.
  • एच. डी कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे राजीनामा दिला.
  • व्हिप जारी केल्यानंतरही बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहिलेल्या बसप आमदार एन. महेश यांची पक्षातून हकालपट्टी - मायावती
  • काँग्रेसने बहुमत चाचणीसाठी व्हिप जारी केला होता. आज (मंगळवार) बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. कायद्यानुसार अनुपस्थित राहिलेले आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते - सिद्धरामय्या
  • कुमारस्वामी राजभवनात पोहचले.
  • सरकार पडल्यानंतर निराश झालेल्या कुमारस्वामींनी विधानसभा सभागृह सोडले.
  • बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारण्यात आले नाहीत. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करायचा किंवा नाही, हे सर्वस्वी आमदारांवर अवलंबून आहे. भाजपकडे सद्या १०५ जागांचे बहुमत असून आम्ही स्थिर सरकार स्थापन करणार आहोत - भाजप नेते जगदीश शेट्टर
  • भाजप उद्या सरकार स्थापनेचा दावा करणार
  • कर्नाटकात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष
  • येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या समस्येकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी आम्ही लवकरात निर्णय घेणार आहोत - बीएस येदियुरप्पा
  • हा लोकशाहीचा विजय आहे. कर्नाटकचे नागरिक कुमारस्वामी सरकारला कंटाळले होते. मी राज्याच्या नागरिकांना आश्वासित करतो, की येणारा काळ फक्त विकासाचा असेल - बीएस येदियुरप्पा
  • आम्ही आज विधानसभेत बहुमत चाचणीत अपयशी ठरलो. राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामा देणार आहे - एच. डी कुमारस्वामी
  • आमचा पराभव हा पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या विश्वासघातामुळे झाला आहे. आम्ही या काळात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मी कर्नाटकाचा नागरिक आहे आणि मला काँग्रेस पक्षात अशाप्रकारे झालेला विश्वासघात अजिबात आवडला नाही - कांग्रेस नेते एच. के पाटील यांची प्रतिक्रिया
  • बीएस येदियुरप्पा आणि भाजप आमदारांचा विधानसभेत जल्लोष
  • कांग्रेस-जेडी(एस)ला ९९ आमदारांचे पाठबळ तर, भाजपकडे १०५ आमदार.
  • बहुमत चाचणीत १०३ चा बहुमत आकडा गाठण्यात काँग्रेस-जेडी(एस) ला अपयश, कुमारस्वामी सरकार पडले.

कुमारस्वामी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची तिसरी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांबाबत निर्णय दिल्याशिवाय या ठरावावर मतदान घेऊ नये, असा आग्रह काँग्रेसच्या सदस्यांनी धरला. यामुळे आज (मंगळवार) विधानसभा अध्यक्षांनी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला.

गोंधळामुळे कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी सोमवारीच मतदान पार पडावे यासाठी प्रयत्न केला होता. ठरावावरील मतदान लांबवणे हा या सभागृहाचा तसेच माझा अवमान ठरेल, असे मत त्यांनी मांडले होते. मात्र, तरीही सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे आज (मंगळवार) सकाळी १ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) ४ वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले. त्यानंतर ६ वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण होईल, असे रमेशकुमार यांनी स्पष्ट केले होते. कर्नाटक राज्य विधानसभेत एकूण २२५ सदस्यसंख्या आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला ११३ पेक्षा अधिक सदस्यसंख्या असणे आवश्यक होते. परंतु, १६ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमताचा आकडा १०३ वर आला होता. मतमोजणी झाल्यानंतर भाजपच्या बाजूने १०५ तर, काँग्रेस-जेडी(एस) चे ९९ आमदार होते.

Intro:Body:

national 1

Conclusion:
Last Updated : Jul 24, 2019, 2:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.