अहमदाबाद - मागील काही महिन्यांपासून गुजरातमधील अहमदाबादेतील स्टेडियम मोटेरा अनेक कारणांनी चर्चेत आहे. हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम होते. मात्र, आज आपण क्रिकेटविषयी बोलत नाही.
अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियम आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे, कारण येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान याचे उद्घाटन करणार आहेत.
नजर टाकूया जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमशी जोडल्या गेलेल्या काही खास बाबींवर...
- मोटेरा स्टेडियममध्ये एका वेळी एक लाख 10 हजार लोक बसू शकतात. ही संख्या दक्षिण अमेरिकेतील अरूबासारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये एका वेळी एक लाख 24 प्रेक्षक बसू शकतात.
- मोटेरा स्टेडियम बांधण्यास 2015 या वर्षांत सुरुवात झाली. याच्यावर आतापर्यंत 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
- हे स्टेडियम 63 एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे. याला तीन प्रवेश द्वारे आहेत.
- स्टेडियममध्ये एक स्विमिंग पूल, चार ड्रेसिंग रूम आणि 75 कॉर्पोरेट बॉक्स बनवण्यात आले आहेत. याशिवाय, स्टेडियममध्ये अत्याधुनिक ड्रेसिंग रूम, फूड कोर्ट आणि आरोग्य केंद्राचीही सुविधा आहे.
- स्टेडियमच्या परिसरात तीन हजाराहून अधिक चारचाकी वाहने आणि 10 हजाराहून अधिक दुचाकी वाहने पार्क करता येतात.
- स्टेडियममध्ये जवळपास 60 हजार लोकांना एकाच वेळी येण्या-जाण्यासाठी एक विशाल रॅम्प बनवण्यात आला आहे.
- मोटेरा स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रो ट्रेनची सुविधाही उपलब्ध आहे.