ETV Bharat / bharat

भारतीय लष्करासाठी Truecaller अ‌ॅपची बंदी अन्यायकारण, कंपनीची प्रतिक्रिया - ट्रुकॉलर अ‌ॅप बंदी भारत

ट्रुकॉलर या कंपनीचे मुख्यालय स्टॉकहोम येते असून कॉलर आयडी, खोटे फोन नंबर ओळखणे आणि संदेश पाठविण्याच्या सेवेसह अनेक सेवा पुरवते. राष्ट्रीय सुरक्षा ध्यानात घेता लष्कराने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 89 संवेदनशील अ‌ॅप मोबाईलमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 9, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या सुरक्षेसंबंधी गोपणीय माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आल्यानंतर भारतीय लष्कराने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 89 अ‌ॅप्स मोबाईलमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. टिकटॉक, फेसबूक, इन्स्टाग्राम, पबजीसह ट्रुकॉलर अ‌ॅपचाही या यादीत समावेश आहे. मात्र, भारतीय लष्करासाठी बंदी घालण्यात आलेल्या अ‌ॅप्समध्ये ट्रुकॉलरचे नाव असणे हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा ध्यानात घेता लष्कराने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 89 संवेदनशील अ‌ॅप मोबाईलमधून काढून टाकण्यास सांगितले आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‌ॅपच्या यादीत ट्रुकॉलरचे नाव आहे, हे खुप निराशाजनक आणि दुख:दायक आहे. ट्रुकॉलर ही स्वीडनमधील कंपनी असून भारताला आपले घर समजते, असे कंपनीच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ट्रुकॉलर या कंपनीचे मुख्यालय स्टॉकहोम येते असून कॉलर आयडी, खोटे फोन नंबर ओळखणे आणि संदेश पाठविण्याच्या सेवेसह अनेक सेवा कंपनी वापरकर्त्याला पुरविते. ‘आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आहोत की, ट्रुकॉलर अ‌ॅप सर्व नागरिक आणि लष्कराच्याही वापरासाठी सुरक्षित आहे. 89 अ‌ॅपच्या यादीत ट्रुकॉलरचा समावेश करण्यास योग्य कारण नाही. आम्ही या प्रकरणी तपास करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे’.

ट्रुकॉलर अ‌ॅप भारतात 17 कोटी नागरिकांना सेवा पुरवत आहे. या अ‌ॅपमुळे खोटे कॉल, संदेश आणि फोननंबर ओळखून ब्लॉक करता येतात. भारतामध्ये ट्रुकॉलरचे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. 2019 साली ज्यांच्या मोबाईमध्ये ट्रु कॉलर आहे, त्यांचा मोबाईलमध्ये व्हायरसमुळे अचानक आयसीआयसी बँकेला जोडणार युपीआय आयडी तयार झाला होता. त्यामुळे सायबर गुन्हे होण्याची शक्यात वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.