रांची - येथील चतरा या गावात राहणाऱ्या आर्यनच्या ह्रदयाला 6 मिली मीटर छिद्र होते. आर्यनला त्याचा मोठा त्रास होत होता. मात्र रिम्स येथील डॉ. प्रशांत यांनी हे छिद्र चिरफाड न करता मिटवले आहे. विशेष म्हणजे डॉ. प्रशांत यांनी हे ऑपरेशन केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत मोफत करून दिले आहे.
या ऑपरेशनसाठी 6 ते 8 लाख रुपये खर्च येतो. मात्र आर्यनच्या कुटुंबीयांना 'राष्ट्र बाल स्वास्थ्य योजनेची' मदत मिळाली. ऑपरेशनंतर रिम्स हॉस्पिटलचे डॅा. डीके सिंग आणि विभागप्रमुख हेमंत नारायण यानी केलेले हे ऑपरेशन म्हणजे कार्डियोलॉजी विभागाची ही यश आहे. रिम्स हॅास्पिटलची गौरवाची बाब असल्याचे सांगितले.