नवी दिल्ली - ‘सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर चौकशीचा विषय केवळ अप्राकृतिक मृत्यूचा आहे. यामुळे मृत्यूविषयीची चौकशी आणि शोधकार्याची केवळ ते अनैसर्गिक होता की नाही, एवढ्यापुरती मर्यादित व्याप्ती आहे,’ असे बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयाला उत्तर देताना म्हटले आहे.
‘सुशांत याच्या मृत्यूची याशिवाय, कोणत्याही प्रकारची दखल मुंबईत घेतली गेली नव्हती. शिवाय, बिहारमध्येही एफआयआर दाखल झाली असली तरी ते बिहार पोलिसांना सहकार्य करत नव्हते,’ असेही बिहार सरकारने म्हटले आहे.
रिया चक्रवर्ती यांनी बिहारहून मुंबईत खटले हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर बिहार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयात दिले आहेत.
"सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचे वडील कृष्णा किशोरसिंग यांनी याचिकाकर्त्यासह आरोपींनी केलेल्या कृतीमुळे आपला तरुण, जिवंत मुलगा गमावला आहे, ही बाब न्यायालयाच्या समोर आणली आहे. म्हणूनच, पाटणा पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचा अधिकार आहे आणि राजीव नगर पोलीस ठाण्यात (पाटणा) नोंदविलेल्या एफआयआर क्रमांक 241 / 2020 मध्ये नमूद केल्यानुसार पाटणा येथील कोर्टाकडे गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे,' असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर असहकाराचा आरोप केला आहे. या प्रकरणात इन्क्वेस्ट रिपोर्ट, शवविच्छेदन अहवाल, एफएसएल अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आदींसह मुंबई पोलिसांनी बरीचशी माहिती सामायिक केली नाही, असे त्यात म्हटले आहे.
याशिवाय, विशेष तपास पथक (एसआयटी) मध्ये असलेले आयपीएस विनय तिवारी मुंबई येथे पोचले, असा आरोपही त्यांनी केला आणि तेथे क्वारन्टाईन झाले, असे बिहार पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, बिहारच्या सूचनेनुसार सुशांतसिंग राजपूत प्रकरण सीबीआयने ताब्यात घेतले आहे.