लाहौल स्पीत (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यात सुरू असलेल्या हिम उत्सवाच्या कार्यक्रमात युवा क्लबचे सदस्य गोशाल गावात स्कीइंग प्रशिक्षण शिबिर चालवत होते. हे स्कीइंग प्रशिक्षण शिबिर तंत्र शिक्षणमंत्री डॉ. रामलाल मार्कंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपले.
अनेक स्पर्धांचे आयोजन-
यावेळी तरुणांनी गोशालाच्या उतारावर स्कीइंगचे प्रदर्शन केले. छोलो आणि टग ऑफ वॉर या पुरुष व महिलांच्या स्पर्धांसह विणकाम स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. समृद्ध आदिवासी संस्कृती एकाच व्यासपीठावर आणून इथल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जात आहे.
कार्यक्रमात डॉ. मार्कंडा म्हणाले की आपण आपली संस्कृती मूळ स्वरूपात सादर केली पाहिजे. यात आपण पारंपारिक वाद्यांचा वापर, पारंपारिक वेशभूषा यावर भर दिला पाहिजे. ते म्हणाले की, या माहोत्सवातील प्रत्येक कार्यक्रम व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे. हे एका पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केले जाईल.
मुख्यमंत्री स्वावलंबन योजनेतून फायदा-
तसेच माहिती देताना मार्कंडा म्हणाले की, मुख्यमंत्री स्वावलंबन योजनेंतर्गत हॉटेल्स किंवा इतर स्वयंरोजगारासाठी 25 टक्के अनुदानावरही सरकार कर्ज देते. ते म्हणाले की उपायुक्त पंकज राय यांच्या प्रशासकीय नेतृत्वात लाहौलमध्ये होणारा हिमोत्सव हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. जो पुढच्या वर्षी अधिक आकर्षक मार्गाने साजरा केला जाईल.
हेही वाचा- चित्तूर मुलींची हत्या प्रकरण : मुलीला मारल्यानंतर आईने तिची जीभ खाल्ली