ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - सातच्या बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at seven PM
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Jun 5, 2020, 7:24 PM IST

  • रायगड - रायगडवर आलेले वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासियांचे कौतुक केले आहे. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

सविस्तर वाचा : #Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री

  • मुंबई - राज्य सरकारने विनापरवानगी गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी आदेश काढले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कामाच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.

सविस्तर वाचा : ...तर गावी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

  • सोलापूर - लाखो वारकऱ्यांचे आराद्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

सविस्तर वाचा : विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप, आषाढी एकादशीपूर्वी पूर्ण होणार प्रक्रिया

  • अमरावती- वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र महिलांनी पूजा करण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : 'बाहेर कोरोना आहे... वडाच्या पूजनासाठी महिलांनी घराबाहेर पडू नये'

  • औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वाचा : औरंगाबादला वाघाच्या पिंजऱ्यात झोपला तरुण, थोडक्यात वाचला जीव

  • मुंबई - शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगावच्या आरे कॉलनीत सध्या काय चाललेय याचा आढावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी घेतला. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाला आळा बसला असून वृक्षतोड झोपडपट्टीसाठी वृक्षतोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे समोर आले. याबाबत स्थानिक आदिवासी नागरीक व सेव्ह आरेतील सक्रिय कार्यकर्ते प्रकाश भोईर यांच्याशी ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.

सविस्तर वाचा : जागतिक पर्यावरण दिन: आरेत लॉकडाऊनमुळे प्रदूषणाला आळा; झोपडपट्टीसाठी वृक्षतोडीचा अयशस्वी प्रयत्न

  • मुंबई- शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरू झाला असून 30 जूनपर्यंत वाढवला गेला आहे. यामुळेच पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1274 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा : लॉकडाऊन काळात मुंबईत 14813 आरोपींवर गुन्हे दाखल

  • तिरुवअनंतपूरम - गर्भवती हत्तीण प्रकरणावरून खोट्या आणि चुकीच्या माहितीवरून केंद्रीय मंत्र्याकडून तिररस्कारांचं अभियान राबवण्यात येत असल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. यातून केरळची आणि मलप्पूरमची प्रतिमा मलिन करण्यात असल्याचे ते म्हणाले.

सविस्तर वाचा : 'हत्तीण प्रकरणावरून केरळची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिरस्काराचं अभियान चालवंल जातंय'

  • फ्रँकफर्ट - दुसरे महायुद्ध संपून आता 75 वर्ष झाली. मात्र, जर्मनीमध्ये अजूनही युद्धकालीन बॉम्ब सापडत आहेत. नुकतेच फ्रँकफर्ट शहरातील कन्वेशन सेंटर येथे बांधकाम सुरू असताना 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला आहे. त्याला नष्ट करण्याचे काम आता बॉम्ब नाशक पथकाकडून सुरू करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : जर्मनीत सापडले दुसरे महायुद्धकालीन बॉम्ब; निकामी करण्यासाठी बॉम्बनाशक पथक पाचारण

  • न्यूयार्क- ट्विटर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाची ठिणगी अजूनही शमत नसल्याचे दिसून आले आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लाईड यांना श्रद्धांजली वाहणारा ट्रम्प यांचा व्हिडिओ ट्विटरने ब्लॉक केला आहे.

सविस्तर वाचा : ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना 'असा' दिला झटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.