ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at seven PM ETV Bharat Maharashtra
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 12, 2020, 6:58 PM IST

  • हैदराबाद - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी देशभर लागू केलेला लॉकडाऊन घटनाबाह्य असल्याचे खासदार आणि एमआयएम पक्षाने नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाल आहेत. लॉकडाऊनवर तेलगांणाचे मुख्यमंत्री शांत का आहेत? असा सवालही त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - देशभर लॉकडाऊन लागू करणे घटनाबाह्य - असदुद्दीन ओवैसी

  • मुंबई - राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच कारागृहातून जवळपास 17 हजार कैद्यांना तात्पुरते जामिनावर सोडण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. तसेच 'जेलमधील काही कैद्यांना सोडण्याचा आणि आठ जेलमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे' अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.

सविस्तर वाचा - कोरोना इफेक्ट : राज्य सरकार 17 हजार कैद्यांना तात्पुरतं सोडणार

  • रत्नागिरी - ठाणे येथून चालत खेड तालुक्यातील वरची हुंबरी या आपल्या गावी येणाऱ्या एका चाकरमान्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदाशिव भिकू कदम (वय 58) असे या चाकरमान्याचे नाव असून महाड तालुक्यातील विन्हेरे जंगलभागात त्यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा - पोलिसांच्या भीतीपोटी मार्ग बदलला... पायी येणाऱ्या चाकरमान्यावर काळाचा घाला

  • मुंबई - विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटला होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर सोमवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे.

सविस्तर वाचा - विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून डमी उमेदवार रमेश कराडांचा अर्ज कायम, तर डॉ. अजित गोपछडेंची माघार

  • नवी दिल्ली - प्रकृती खालावल्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी (१० मे) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना आज (मंगळवारी) घरी सोडण्यात आले आहे. ताप, छातीत दुखत असल्याने आणि श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सविस्तर वाचा - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून 'डिस्चार्ज'

  • सांगली - विटा तहसीलदार मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. वाळू वाहतूक दंड प्रकरणातून चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदारांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.

सविस्तर वाचा - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या अटकेसाठी सांगलीत महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

  • जळगाव - रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे गेलेले जळगाव जिल्ह्यातील 170 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी सुखरूप जळगावात परत आणण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या 6 बसेसने हे विद्यार्थी आपल्या घरी परत आले.

सविस्तर वाचा - तामिळनाडूत अडकलेले 170 विद्यार्थी सुखरूप परतले घरी; बसने आणले जळगावात

  • लॉस एंजेलिस - कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाने संपूर्ण जगाला वेढले आहे. त्यामुळे अनेक नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येतात किंवा रद्द केले जातात. याचाच फटका ऑस्कर पुरस्कारालाही बसला आहे. पुढच्या वर्षी होणारा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा चार महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ९३ वर्षांच्या काळात हा सोहळा पहिल्यांदाच पुढे ढकलण्यात आलाय.

सविस्तर वाचा - ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार सोहळा ४ महिने लांबणीवर

  • अमरावती - लॉकडाऊनमुळे बिहारचे बाराशे मजूर आंध्रप्रदेशातील गुटुंर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. घरी जाण्याची व्यवस्था करावी यासाठी मजूरांनी बिहार सरकार तसेच पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना करत आहेत. सर्वजण रोजंदारीवर काम करणारे असल्याने हाताचे काम गेले आहे.

सविस्तर वाचा - आंध्रप्रदेशात बिहारचे बाराशे मजूर अडकले; काम नसल्यानं उपासमारीची वेळ

  • पणजी - गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत ५ हजार ३०७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३ एप्रिलपर्यंत फक्त ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना यशस्वी उपाचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर सोमवारी चाचणी केलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सविस्तर वाचा - गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, आतापर्यंत ५ हजार ३०७ जणांची चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.