- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थितीत होते.
सविस्तर वाचा - विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
- नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे, यात 44 हजार 29 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 20 हजार 916 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सविस्तर वाचा - INDIA COVID-19 TRACKER : कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ हजारांवर, 2 हजार 206 जण दगावले...
- मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. रविवारी १ हजार २७८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ४ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा - MAHA CORONA LIVE : राज्यात आतापर्यंत 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाची लागण; 106 पोलिस अधिकारी, तर 901 पोलिसांचा समावेश
- मुंबई - कोरोनाच्या काळात लढणाऱ्या तब्बल १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये १०६ पोलीस अधिकारी असून ९०१ पोलीस कर्मचारी आहेत. अद्यापही ८८७ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वाचा - चिंताजनक! राज्यात आतापर्यंत १,००७ पोलिसांना कोरोनाची बाधा
- नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निगराणीत ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. छातीत दुखत असल्याने त्यांना काल(रविवार) एम्स रुग्णालयातील हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग हे ८७ वर्षांचे आहेत.
सविस्तर वाचा - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर
- मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज कोरोनाची लागण झालेले शेकडो रुग्ण आढळून येत असल्याने कंटेनमेंट झोनच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या 2 हजार 646 कंटेनमेंट झोन असून गेल्या 12 ते 13 दिवसात या झोनच्या संख्येत तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
सविस्तर वाचा - corona virus : मुंबईत 2 हजार 646 कंटेनमेंट झोन, प्रतिबंधित क्षेत्राची 13 दिवसात तिप्पटीने वाढ
- नाशिक - देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मालेगावात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून मृतांचा आकडादेखील वाढत आहे. गेल्या 24 तासात एकट्या मालेगावात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात 39 नवे रूग्ण आढळले आहेत.
सविस्तर वाचा - नाशिकसह मालेगावात कोरोनाचा कहर, रविवारी आठ जणांचा मृत्यू
- लातूर - लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसला आहे. हाताला काम नाही आणि खिशात पैसा नाही, त्यामुळे जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याने मजूर गाव जवळ करत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहनाची सोय नसल्याने अनेक मजूर पायपीट करत ठाण्यातून बिदरकडे निघाले आहेत. या मजुरांनी सलग 5 दिवस पायपीट केल्यानंतर हे मजूर लातुरात पोहोचले होते.
सविस्तर वाचा - 'जगण्यासाठी शहरात आलो; जिवंत राहण्यासाठी गाव गाठले', मजुरांची 600 किमीची पायपीट
- नवी दिल्ली - तिसऱ्या लॉकडाऊनचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. मागील ४९ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, बाजारपेठासह सर्वकाही ठप्प आहे. अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खायला लागली आहे.
सविस्तर वाचा - पंतप्रधान आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद; ढासळती अर्थव्यवस्था प्रमुख अजेंडा?
- भारतामध्ये ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९८ साली याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव देण्यात आले होते. फक्त अणुतंत्रज्ञानच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील भारताची तंत्रज्ञानातील प्रगती या दिवशी अधोरेखीत केली जाते.
सविस्तर वाचा - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस: ११ मे १९९८ ला पोखरण अणुचाचणी घेऊन जगाला दिला धक्का