- नवी दिल्ली - १७ मे ला देशभरामध्ये लागू असेलला तिसरा लॉकडाऊन संपणार आहे. काल(सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर आज मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार, की नागरिकांना आणखी सूट मिळणार हे समजणार आहे.
सविस्तर वाचा - पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधणार
- औरंगाबाद - कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करत असल्याने एका परिचरिकेच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत समोर आली आहे. चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या परिचारिका शिल्पा हिवाळे या जिल्हा रुग्णालयात आपली रुग्णसेवा बजावत आहे. 'तुमच्यामुळे आमच्या परिसरात कोरोना येईल.
सविस्तर वाचा - कोरोना वॉरियर्सच्या घरावर हल्ला, 'तुम्ही कोरोनाची ड्युटी करता तर इथे रहायचं नाही'; औरंगाबादेत परिचारिकेला धमकी
- मुंबई - आज जागतिक परिचारिका दिवस आहे. त्यानिमित्त दुपारी १२ वाजता परिचारिका आपल्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी मेणबत्ती किंवा दिवे लावून कोरोना युद्धात जोखमीचे काम करत असलेल्या परिचारिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणार आहेत. शिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव लवकरात लवकर थांबावा यासाठी देखील प्रार्थना केली जाणार आहे.
सविस्तर वाचा - जागतिक परिचारिका दिन : कोरोनाच्या संकटात रुग्णांचा आधार; मेणबत्ती, दिवे लावत सुरक्षेसाठी करणार प्रार्थना
- नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी चौथ्या लॉकडाऊनचा उल्लेख केल्यामुळे, देशात चौथे लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा १५ मेला बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
सविस्तर वाचा - पंतप्रधानांनी दिले चौथ्या लॉकडाऊनचे संकेत, '१५ मे'ला पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांसह चर्चा..
- ठाणे - 'मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ओळखताना त्यांनी अंगावर गोळीही झेलली होती. आम्ही नेहमीच अशा योध्यांचा सन्मान करतो' असे उद्गार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबई हल्ल्यातील साक्षीदार असणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे कल्याण येथील आयुष रुग्णालयात आले होते.
सविस्तर वाचा - दहशतवादी कसाबला ओळखणाऱ्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप करणार; फडणवीसांकडून मदतीची घोषणा
- मुंबई - 'लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरू होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करावी,' अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ते सोमवारी (ता. 11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधत होते.
सविस्तर वाचा - 'मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करावी'
- मुंबई - कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याविषयी अनेक प्रकारच्या तक्रारी आल्याने यावर फेरविचार केला जाणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक २० जून रोजी घेतली जाणार आहे.
सविस्तर वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत नव्याने फेरविचार, २० जूनला होणार आढावा बैठक
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्यवसाय काय? त्यांची संपत्ती किती? याविषयी विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आता याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली असून ठाकरे यांच्या नावे 143 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोट्यधीश; विधानपरिषद निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
- नवी दिल्ली - पुढील काही आठवडे स्थलांतरीत मजूरांना घरी पाठविण्यासाठी १०० रेल्वे गाड्या दररोज चालवण्यास गृह मंत्रालयाने रल्वे मंत्रालयास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने रेल्वे विभागातील नोडल अधिकारी आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांबरोबर यासंबंधी बैठक घेतल्याचे गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव एस. श्रीवास्तव काल(सोमवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वाचा - "स्थलांतरीत कामगारांना घरी पोहचवण्यासाठी दररोज १०० रेल्वे चालवा"
- नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जपान, इस्त्राईल, दक्षिण कोरिया या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. कोरोनामुळे जगभरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे, त्यावरही चर्चा झाली.
सविस्तर वाचा - कोरोना संकट हाताळण्यासाठी भारताची विविध देशांशी परराष्ट्रमंत्री स्तरावर चर्चा