- मुंबई : एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. अशात राज्यात आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १४७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ आहे. तर, सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा : CORONA: राज्यात आज १४७५ रुग्ण कोरोनामुक्त, नवीन बाधितांची संख्या २४३६
- हैदराबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. कर्जत जामखेडमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला? तसेच राज्यातील तरुणाईसंदर्भात रोहित यांचे विचार काय आहेत? याबाबत रोहित यांनी ईटीव्ही भारतशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय. पाहा रोहित पवार यांची ही विशेष मुलाखत.
सविस्तर वाचा : कोरोनामुक्तीचा कर्जत जामखेड पॅटर्न, आमदार रोहित पवार यांची अनकट मुलाखत
- हैदराबाद : चार लॉकडाऊननंतर आता हळूहळू देशभरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार पंतप्रधानांनी टप्प्याटप्प्याने राज्ये 'अनलॉक' करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार 'मिशन बिगिन अगेन'ला सुरुवात झाली आहे. त्यातूनच राज्यातील व्यवहार आता हळूहळू सुरळीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा राज्यभरातील आढावा...
सविस्तर वाचा : 'मिशन बिगिन अगेन' : राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येताना...
- पाटणा : बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये शुक्रवारी काही तास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र, जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी फरार झाले. यानंतर त्यांनी मागे सोडलेले बरेचसे सामान जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा : पोलीस-नक्षलींमध्ये चकमक; जंगलाचा फायदा घेत नक्षली फरार..
- दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या घडामोडींमध्ये उत्तर दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये एका वेगळ्याच प्रकाराची चर्चा आहे. पत्नी आपल्या पतीला भेटण्यासाठी त्याच्या घरासमोर धरणे देवून बसली आहे. पतीला आपल्यासोबत भेटू दिले जात नसल्याचा पत्नीचा आरोप आहे.
सविस्तर वाचा : पतीला शोधण्यासाठी सासरी पत्नीचे धरणे, पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप
- नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' हा केवळ डिजीटल माध्यमांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. योग दिनानिमित्त लोकांना दरवर्षीप्रमाणे एकत्र येता येणार नाही. सरकारने व्हिडीओ ब्लॉगमधून योग दिनात सहभागी होणाऱ्यांना बक्षिसे जाहीर केली आहेत.
सविस्तर वाचा : यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा केवळ 'डिजीटल योग'
- मुंबई : नागरिक पाळीव प्राण्यांना जसे की, श्वानांना लॉकडाऊन असताना बाहेर फिरायला नेऊ शकतात, असे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. या संबधीचा आदेश एक जूनला काढण्यात आला असून पोलीस आणि प्रशासनाला नागरिकांना पाळीव प्राण्यांना बाहेर आणण्यापासून मज्जाव न करण्याचे सांगण्यात आले आहे, असे अडॅ. आषुतोश कुंभकोणी यांनी सांगितले.
सविस्तर वाचा : पाळीव प्राण्यांना फिरायला घराबाहेर घेऊन जाता येणार, सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण
- न्यूयॉर्क : कोरोना संकट काळात 120 कोटी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत, असे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफने म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातील असमानतेमुळे जागतिक स्तरावर शिक्षणाचे संकट उभे राहील, असा इशारा युनिसेफने दिला आहे.
सविस्तर वाचा : ई-लर्निंग सुविधेतील असमानतेमुळं शैक्षणिक क्षेत्रापुढं संकट
- नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊनमुळे क्रीडाविषयक उपक्रम बंद आहेत. भारतातील इंडियन प्रीमियर लीग स्पर्धाही (आयपीएल) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. असे असले तरी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मैदानाबाहेर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सविस्तर वाचा : लॉकडाऊनमध्ये विराटचा विक्रम, 'अशी' कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू
- मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने आत्तापर्यंत बर्याच प्रवासी कामगारांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवले. यामुळे स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला काही अंशी मदत झाली. आता पुन्हा 5 जून रोजी संध्याकाळी अभिनेता सोनूने वडाळा टीटी येथून 220 लोकांसाठी बसेसची व्यवस्था केली.
सविस्तर वाचा : सोनू सूदची स्थलांतरित कामगारांना मदत, मुंबईतून आणखी पाच बस रवाना