ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at nine PM
Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 22, 2020, 8:58 PM IST

  • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या कराचीजवळ एक विमान कोसळ्याची घटना घडली आहे. यामध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पीआयए एअरबस ए३२० या प्रवासी विमानामध्ये १०७ लोक होते. यांपैकी ९९ प्रवासी, तर आठ विमान कर्मचारी होते, अशी माहिती मिळाली आहे.

सविस्तर वाचा - पाकिस्तान विमान दुर्घटना; शंभरहून अधिक ठार..

  • अमरावती - राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन करण्यात आले आहेत. यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहे. अमरावतीचा समावेश रेड झोनमध्ये आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळून आला. यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे जिह्यात १४ जणांचा बळी गेला आहे. 'ईटीव्ही भारत'ने अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा आपल्या 'हालहवाल कोरोना' या विशेष मालिकेत घेतला आहे. पाहा हा विशेष वृत्तांत...

सविस्तर वाचा - 'हालहवाल कोरोना' : अमरावती जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा सविस्तर आढावा, पाहा एका क्लिकवर...

  • मुंबई - कोरोना संकटाच्या उपाययोजनेवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी भाजपतर्फे आज राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने, केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने देखील राज्यातील बारा बलुतेदार व कामगारांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा - महाराष्ट्र बचाव : राज्यातील कामगारांसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, भाजपची मागणी

  • मुंबई - सध्या राज्यात कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून महाविकास आघाडीची प्रत्येक टप्प्यावर निष्क्रियता सातत्याने दिसत आहे. राज्यातील जनतेमध्ये असंतोष आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच राज्यातील 12 बलुतेदार, कामगारांना तब्बल 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा - 'कोरोनाची स्थिती हाताळताना सरकारची प्रत्येक टप्प्यावर निष्क्रियता'

  • कोल्हापूर - कोरोनाची परिस्थिती हाताळायला हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज (शुक्रवार) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. 'मेरा आंगण मेरा रणांगण' हे घोषवाक्य घेऊन भाजपचे कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे मास्क, काळ्या फिती लावून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा कोल्हापुरातील संभाजीनगर येथे आपल्या घरासमोर अंगणात हे आंदोलन केले.

सविस्तर वाचा - 'मेरा आंगण मेरा रणांगण' आंदोलनाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर तोफ, म्हणाले...

  • मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत आहे. मात्र, भाजप राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. त्यासाठी त्यांनी आज केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे हसे झाले. वारंवार राजभवनाच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजप नेत्यांनी आतातरी स्वतः च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - 'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा भाजपने स्वतः च्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी'

  • नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. याआधी या पदावर जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे होते. हर्षवर्धन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जगभरात कोरोना विषाणूच्या बळींना श्रद्धांजली वाहिली.

सविस्तर वाचा - 'डब्ल्यूएचओ'च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून हर्ष वर्धन यांनी स्वीकारला पदभार

  • भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली. यामध्ये पश्चिम बंगालनंतर ते ओडिशामध्ये दाखल झाले होते. ओडिशाची पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्याच्या मदतीसाठी ५०० कोटीं रुपये देण्याची जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा - 'अम्फान' LIVE : केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 500 कोटींची मदत जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

  • नवी दिल्ली - 'केंद्र सरकारने केवळ विराम घेतला आहे. कोरोनाच्या संकटाचा फटका बससेल्या क्षेत्रांसाठी आणखी सुधारणा जाहीर केल्या जाणार आहे', असे केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारताला मेक इंडियातून 'आत्मनिर्भर भारत' करणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या संकटात आणखी आर्थिक पॅकेज देण्याचे अनुराग ठाकूर यांचे संकेत

  • नवी दिल्ली - देशभरात टाळेबंदीने अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्यात कपात होत असताना दिलासादायक वृत्त आहे. अ‌ॅमेझॉन इंडियाने ५० हजार कर्मचारी हंगामीतत्वावर घेणार असल्याचे जाहीर केले. देशभरात टाळेबंदी असल्याने ऑनलाईन उत्पादनांची ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी नवे कर्मचारी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - टाळेबंदीतही अ‌ॅमेझॉन इंडिया देणार ५० हजार नोकऱ्या; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.