ETV Bharat / bharat

Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाचच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at five PM
Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाचच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:43 PM IST

  • चंद्रपूर- जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य नियोजन आणि संरक्षण केल्याने वाघांची संख्या येथे शंभराहून अधिक झाली आहे. वन्यजीव शृंखलेत सर्वोच्चस्थानी असलेला वाघ वाचला तरच पर्यावरण वाचेल हे साधं आणि सोपं गणित आहे. मात्र, एक वेळ अशीही होती जेव्हा ताडोबात वाघांची शिकार केली जायची, अत्यंत अमानुष आणि क्रुर पद्धतीने त्यांना संपविले जायचे. केरळ येथे हत्तीणीचा मृत्यू झाला आणि पुन्हा हा विषय चर्चेला आला.

सविस्तर वाचा : पर्यावरण दिन विशेष: 'हत्तीणीचा जीव गेला.. वाघांना त्यापेक्षा क्रुरतेने मारले जायचे'

  • मुंबई - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबई टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आज (शुक्रवार)पासून वाहनांच्या वाहतुकीवरील बंधने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून भायखळा, जेजे उड्डाण पुलाखाली वेगवेगळी दुकाने उघडण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा : रिस्टार्ट मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी, दुकानेही उघडली

  • हैदराबाद - टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारला महसुली उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने खर्च आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणत्याही नव्या योजनांची घोषणा करू नका, अशा सूचना वित्त मंत्रालयाने सर्व विभागांच्या मंत्रालयाला दिल्या आहेत.

सविस्तर वाचा : आर्थिक संकट : नव्या योजनांची घोषणा नको; वित्त मंत्रालयाचे आदेश

  • रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन यशस्वी झाले आहे. पॅकेज हा शब्द माझ्याकडे नाही. मी थेट मदत देत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.

सविस्तर वाचा : रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत - मुख्यमंत्री

  • पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ परिसराची आज (शुक्रवार) पाहणी केली. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

सविस्तर वाचा : निसर्ग चक्रीवादळ: नुकसानग्रस्त भागाला अजित पवारांची भेट, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश

  • औरंगाबाद - एकीकडे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, यासाठी महिला वडाची पुजा करतात. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र महिला वडाच्या झाडाचे पूजन करत आहेत. मात्र, याचवेळी पत्नीपीडितांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 'ही पत्नी आता नको', अशी भावना व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा : पुढच्या जन्मी 'ही' पत्नी नको, पीडित पुरुषांचे पिंपळाच्या झाडाला साकडे

  • औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने अवघ्या सात दिवसांतच एका चिमुकलीने आपली आई गमावली आहे. 28 मे रोजी या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला होता.

सविस्तर वाचा : कोरोनाबाधित महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू, सात दिवसांच्या मुलीचे मायेचे छत्र हरपले

  • नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजने रोहित शर्मासमवेत इन्स्टाग्रामवर बोलताना युजवेंद्र चहलबाबत एक जातीवाचक टिप्पणी केली. त्यानंतर, नेटकऱ्यांनी युवराजकडून माफीची मागणी केली.

सविस्तर वाचा : युवराज सिंगवर गुन्हा दाखल, अटक होण्याची शक्यता

  • डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित पर्यटन मंत्र्याच्या संपर्कात आल्याने रावत यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले होते. आज(शुक्रवार) त्यांचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा : उत्तराखंड : कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणारा मंत्रीच कोरोनाबाधित; मुख्यमंत्र्यांची चाचणी मात्र 'निगेटिव्ह'

  • बंगळूरू- बायोकोन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांना गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या आभासी वर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात यंदाचा जागतिक उद्योजक पुरस्कार देण्यात आला. यावेळी बायो फार्मास्युटिकल्स कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 41 देश आणि प्रांतामधील 46 ईओवाय देश पुरस्कार विजेत्यांच्या विशिष्ट यादीमधून त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : किरण मजुमदार शॉ यांना यंदाचा जागतिक उद्योजक पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.