- मुंबई - राज्यात आज १,९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधित ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा - CoronaVirus : राज्यात आज 3 हजाराहून अधिक नवे कोरोना पॉझिटिव्ह, 91 रुग्णांचा मृत्यू
- हैदराबाद : गोऱ्या अमेरिकनांकडून अफ्रिकन अमेरिकनांना रोजच भेदभाव, शोषण आणि छळाला सामोरे जावे लागत असल्याचे मत सध्या अमेरिकेत अफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्राची पाटणकर यांनी व्यक्त केले आहे. पाहूयात 'ईटीव्ही भारत'ची ही विशेष मुलाखत...
सविस्तर वाचा - जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्येनंतर कृष्णवर्णीयांचा उद्रेक हा उठाव - प्राची पाटणकर
- नवी दिल्ली - माजी राज्यसभा खासदार शाहिद सिद्दीकी यांच्या पुतणीचा उपचार करण्यास दिरंगाई झाल्याने मृत्यू झाला आहे. तिला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने, तसेच ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वाचा - उपचारास दिरंगाईमुळे माजी खासदाराच्या पुतणीचा मृत्यू; दिल्लीमधील प्रकार..
- श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील रेबन परिसरात शोधमोहीम होती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत 5 जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा - जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार
- पुणे - राजकारण करण्यावेळी राजकारण करू आता राजकारण करू नये. फडणवीसांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लावला आहे. सोनू सूदने चांगले काम केले आहे. त्यामुळे सोनू सूद असो की इतर कोणी संकटकाळात काम करणाऱ्यांचे अभिनंदनचं आहे. संजय राऊत सोनू सूदबद्दल काय बोलले ते माहीत नाही. मात्र, जो कोणी चांगले काम करेल त्यांच्या माझ्यावतीने अभिनंदनच आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
सविस्तर वाचा - सोनू सूद असो की इतर कोणी चांगले काम करणाऱ्यांचे अभिनंदनचं: गृहमंत्री
- मुंबई - कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमांतून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे? हे केंद्र सरकारने एकदाचे देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - 'दाऊदचा मृत्यू झाला की जिंवत आहे? केंद्र सरकारने खुलासा करावा''
- ठाणे - विनाकारण भिती दाखवून रुग्णालयामध्ये अॅडमीट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून, पालिकेने ठाण्यातील 2 खासगी रुग्णालयाला दंड आकारला आहे. हा दंड तब्बल १६ लाख रुपयांचा आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई असून, गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयाविरोधात तक्रारी येत होत्या, त्याची शहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली.
सविस्तर वाचा - ठाण्यातील 2 रुग्णालयांना 16 लाखांचा दंड, अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याप्रकरणी कारवाई
- पाटणा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगल राज ऐवजी जनता राज आले आहे. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल आणि भाजप आघाडीचा राज्यात दोन तृतीयांश बहुमताने विजय होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत.
सविस्तर वाचा - 'नितिश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएचा बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताने विजय होईल'
- नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कोरोना संकटात अ़डकलेल्या लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांना 17 हजार 705 कोटींचे कर्ज विनातारण दिले आहे. या कर्जाला 100 टक्के सरकारची हमी आहे. 'इमर्जन्सी क्रेडिटलाइन गॅरंटी' योजनेअंतर्गत हे कर्ज उद्योगांना देण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - लघु, मध्यम उद्योगांना बँकांकडून विनातारण 17 हजार 705 कोटींची कर्ज मंजूर
- सॅन फ्रान्सिस्को (यूएस) - उत्तर कॅलिफोर्नियातील सांताक्रुझ येथे एका हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल घडली. सार्जंट डामोन गुट्झविल्लर (वय 38) असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वाचा - कॅलिफोर्नियात वाहनाची झडती घेत असताना हल्ला; एका पोलिसाचा मृत्यू