ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - देशातील टॉप बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Jan 25, 2021, 3:39 PM IST

Updated : Jan 25, 2021, 10:48 PM IST

  • नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांसह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासह १० जणांना पद्मभूषण तर, १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कार : जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबेंसह सिंधुताई सपकाळांचाही सन्मान

  • नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची सुरक्षा, कोरोना, आत्मनिर्भर भारत, लॉकडाऊन, कोरोना लस, शेतकरी आदी मुद्यांवर भाष्य केले. तसेच सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत राय, महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी स्वतंत्रता संग्रामाला प्रेरीत केले. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता आपल्या जीवनाचे सिद्धांत आहेत. या मुल्यांचा प्रवाह आपल्या जीवनाला समृद्ध करतो. वेळेनुसार बदलत नव्या पीढीने याची सार्थकता स्थापित करावी, असे राष्ट्रपती म्हणाले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण, वाचा महत्वाचे मुद्दे...

  • मुंबई - आज राज्यात 1842 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 10 हजार 948 वर पोहोचला आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 815 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.25 टक्के तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे. गेल्या काही महिन्यात आज सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णांची नोंद, 30 रुग्णांचा मृत्यू

  • परभणी - आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी परभणीत खादी निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उभा करणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्री मलिक यांनी केली.

शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश - नवाब मलिक

  • मुंबई - राज्यापालांना कंगणाला भेटायला वेळ आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ते आझाद मैदानात आयोजित शेतकरी मोर्चाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले.

राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही - शरद पवार

  • मुंबई - आज आपण दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देणासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या या पाठिंब्यामुळे नक्कीच त्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या लढ्याला बळ मिळेल. आपण आणि आपले शेतकरी 60 दिवस लढत आहेत, पण सरकार एक-दोन लोकांच्या हितासाठी काम करत असून त्यांना शेतकरी दिसत नाही. तेव्हा यावरून हे सरकार भांडवलदारांचे गुलाम आहे, हेच स्पष्ट होत असल्याचे म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

हे सरकार भांडवलदारांचे गुलाम - बाळासाहेब थोरात

  • मुंबई - कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात राज्यभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. या महामोर्चातील दिवसभरातील विविध टप्प्यांविषयी शेतकरी नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी माहिती दिली आहे.

जाणून घ्या मुंबईतील शेतकरी महामोर्चातील महत्वाचे टप्पे

  • मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांकडून न्यायालयात BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता सह रिपब्लिक वृत्तवाहिनीचा सीईओ विकास खान चंदनी व BARC चा रोमिल रामगडिया यांच्याविरोधात 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. हे अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 12 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

टीआरपी प्रकरणी पोलिसांकडून 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल

  • मुंबई - ब्रिस्बेन कसोटीसाठी जेव्हा भारताच्या ११ खेळाडूंचा अंतिम संघ निवडला गेला. तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण या कसोटीसाठी वॉशिग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले. अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असताना, नवख्या सुंदरला स्थान देण्यात आल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांच्या मते, सुंदरच्या जागेवर कुलपीला संधी मिळायला हवी होती. आता या विषयावर कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्टीकरण दिले आहे.

..म्हणून कुलदीपच्या जागी सुंदरला निवडलं, अजिंक्यने सांगितलं कारण

  • मुंबई - रविवार २४ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन बोहल्यावर चढला. त्याचे त्याची बऱ्याच वर्षांची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत शुभमंगल झाले. खरंतर त्याला अनुष्का-विराट, रणवीर-दीपिका प्रमाणे परदेशात लग्नसोहळा भरवायचा होता व त्यादृष्टीने तयारीही सुरु होती, परंतु गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे त्या सर्वावर पाणी फेरले गेले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे ‘अजून किती थांबायचं’ आसा विचार करत त्याने अलिबाग येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केले. मोजकेच लोक एकत्र येण्याच्या अटींमुळे लग्नाला जवळचे नातेवाईक व मित्रमैत्रिणी आदि उपस्थित होते. २६ तारखेला वरुण मुंबईत मोठे रिसेप्शन ठेवणार आहे, जेणेकरून बॉलिवूडकरांना त्याला आशीर्वाद देण्याची संधी मिळेल.

मनोरंजनसृष्टीत लॉकडाऊननंतर लगीनघाई.. 'हे' सेलेब्रिटी चढले बोहल्यावर

Last Updated : Jan 25, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.