ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 AM : रात्री 9 पर्यंतच्या ठळक बातम्या! - आजच्या ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top ten news stories around the globe
Top 10 @ 7 AM : सायंकाळी सात पर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Sep 24, 2020, 9:22 AM IST

Updated : Sep 24, 2020, 9:30 PM IST

मुंबई - कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढतच असून गेल्या 24 तासांत राज्यात 19 हजार 164 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 82 हजार 963 झाली आहे. राज्यात 2 लाख 74 हजार 993 सक्रिय रुग्ण आहेत.

सविस्तर वाचा - राज्यात 19 हजार 164 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

  • मुंबई - कोरोनाचे संकट आणि जागतिक अर्थव्यवस्थांमधील खराब परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारांची पडझड सुरूच आहे. आज सेन्सेक्समध्ये १,११५ अंशांची मोठी घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात निराशाजनक परिस्थिती असताना आज प्रमुख निर्देशांकांनी मोठी आपटी नोंदवली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला.

सविस्तर वाचा - शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स १,११५ अंशांनी घसरला

  • कोल्हापूर - पाशवी बहुमताच्या जोरावर कृषी विधेयक मंजूर केले, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या कृषी विधेयकाने पारतंत्र्यातील शेतकरी स्वतंत्र झाल्याचा दावा केला, शरद जोशी याचा दाखल देत त्यांचे स्वप्न साकार झाले, असे अनेकांनी सांगितले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. बाजार समिती हे तर शेतकऱ्यांचे कत्तलखाने व राजकीय अड्डे, शरद जोशींच्या मताशी मी सहमत आहे. समांतर व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केंद्र सरकारचा असेल तर चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांकडून चांगला हमीभाव मिळत असेल तर आमचा विरोध नाही, पण त्या अगोदर हमीभाव कायदा मंजूर करावा लागेल, असे शेट्टी म्हणाले.

सविस्तर वाचा : EXLCUSIVE : शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा खासगी कंपन्यांचा डाव, हमीभाव मिळत असेल तर आमचा विरोध नाही

  • नागपूर - जम्मूत दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले आहे. नरेश बडोले, असे त्या हुतात्मा जवानाचे नाव असून ते जम्मूत आपले कर्तव्य बजावत होते.

सविस्तर वाचा : जम्मूत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण

  • जळगाव - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. गुरुवारी जळगावातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले. सोने 100 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल अडीच हजाराने कमी झाले आहेत.

सविस्तर वाचा : जळगावात चांदीसह सोने पुन्हा घसरले; आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री वाढल्याचा परिणाम

  • ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात काल अळ्या सापडल्या. सोयाबीनच्या भाजीत या अळ्या सापडल्या असून या धक्कादायक प्रकराबाबत रुग्णांनी कोविड सेंटरमधील महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तत्काळ हे जेवण बदलण्यात आले असून याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सविस्तर वाचा : धक्कादायक..! टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या जेवणात अळ्या

  • जळगाव - बॉलिवुडचे काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअ‌ॅप चॅटवरून ड्रग्ज संदर्भात काही नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, फक्त व्हाट्सअ‌ॅप चॅट हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही. त्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) या प्रकरणाची पाळेमुळे शोधावीच लागतील, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा : सुशांतसिंह मृत्यू प्रकरण : व्हाट्सअ‌ॅप चॅटबाबत उज्ज्वल निकम यांनी 'हे' व्यक्त केले मत

  • मुंबई -सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवुडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. बॉलिवुडमधील काही कलाकारांची चौकशी होत आहे. असे असले तरी या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भाजप-बॉलिवुड-सँडलवुड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला.

सविस्तर वाचा : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?- सचिन सावंतांचा खोचक प्रश्न

  • कराड (सातारा) - आम्ही सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते आरक्षण जर टिकवायचे असते, तर आमच्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने न्यायप्रविष्ट असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागायला पाहिजे होती. मात्र, फडणवीस सरकार केवळ गंमत बघत बसले. सरकारच्या वकिलांनीही बाजू मांडली नाही. त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती मिळाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते कराड येथे माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा : फडणवीस गंमत बघत बसले; मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा

  • दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस गावातील पुणे-सोलापूर महामार्गलगत आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिरानजिकची जलवाहिनी फुटून प्रचंड वेगाने पाणी पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले. सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी झाले. या पाण्याच्या दाबामुळे दुचाकीस्वार पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती. याबाबत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

सविस्तर वाचा : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे फुटली

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली पदार्थाच्या संबंधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अभिनेत्री सारा अली खान समन्स बजावले आहे. या समन्सनंतर अभिनेत्री सारा अली खान ही गोव्याहून मुंबईला परतली आहे.

सविस्तर वाचा : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या समन्सनंतर अभिनेत्री सारा अली खान गोव्याहून मुंबईत परत

  • मुंबई - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांचे निधन झाले आहे. डीन यांना मुंबईमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. दरम्यान, त्यांच्या अकाली निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

सविस्तर वाचा : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जॉन्स यांचे मुंबईत अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

Last Updated : Sep 24, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.