- मुंबई - रिया चक्रवर्तीला आज एनसीबीकडून अटक केली आहे. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे.
सविस्तर वाचा- रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक
- पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 'जम्बो हॉस्पिटल'मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ठोंबरे यांनी गुरुवारी आंदोलन केले होते.
सविस्तर वाचा- जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांना अटक
- टोकियो - प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीमाना दिल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्षात शयर्त सुरू झाली आहे. जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रटीक पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाते.
सविस्तर वाचा- शिंजो आबेंच्या राजीनाम्यानंतर जपानमध्ये पंतप्रधान पदासाठी शर्यत
- नवी दिल्ली - 'जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळं करू शकत नाही, असा इशारा बीजू जनता दल पक्षाचे नेते आणि खासदार प्रसन्ना आचार्य यांनी चीनला दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी अरुणाचल प्रदेशबाबत केलेल्या वक्तव्याचाही आचार्य यांनी निषेध केला.
सविस्तर वाचा- 'जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळं करू शकत नाही'
- पुणे - एल्गार परिषद प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा)पुण्यातील आणखी तिघांना अटक केली आहे. सोमवारी रात्री सागर गोरखे, रमेश गायचोर यांना तर मंगळवारी ज्योती जगताप हिला अटक केली आहे.
सविस्तर वाचा- 'एल्गार' प्रकरणात पुण्यातील आणखी तिघांना एनआयएने केली अटक
- सिडनी - बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होण्यासाठी युवराज सिंग प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलियाच्या या प्रसिद्ध लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज क्लबच्या शोधात आहे. शिवाय, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) त्याला मदत करत असल्याचेही वृत्त आहे.
सविस्तर वाचा- युवराज सिंग बिग बॅश लीगमध्ये खेळणार?
- रायगड - अलिबागच्या हर्षल जुईकरने आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर केलेले रेल्वे मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे रेल्वे अपघात टळू शकतील, असे त्याचे म्हणणे आहे. या मॉडेलची दखल घेत गुगलने हर्षलला शिष्यवृत्ती दिली आहे. केंद्र सरकारनेही आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हर्षलकडून मॉडेल मागविले आहे.
सविस्तर वाचा- अलिबागच्या हर्षलची 'गुगल'कडून दखल; अपघात रोखणारे रेल्वे मॉडेल केले विकसित
- मुंबई - विधान परिषदेच्या चौदाव्या उपसभापती म्हणून आज शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची आज निवड झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली.
सविस्तर वाचा- विरोधकांच्या गदारोळातच डॉ. निलम गोऱ्हेंची उपसभापतीपदी निवड
- नवी दिल्ली - विश्वविजेती भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यावर्षी 'थॉमस अॅण्ड उबर' चषकात खेळणार आहे. यापूर्वी, तिने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. मात्र ती आता ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत खेळणार आहे.
सविस्तर वाचा- अखेर 'थॉमस अॅण्ड उबर' स्पर्धेत सिंधू होणार सहभागी
- मुंबई - आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि माजी सीईओ चंदा कोचरचे पती दीपक कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. ईडीने दीपक कोचर यांना सोमवारी अटक केली.
सविस्तर वाचा- व्हिडीओकॉन घोटाळा: ईडीने दीपक कोचर यांना विशेष पीएमएलए न्यायालयासमोर केले हजर