ETV Bharat / bharat

top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top 10 News at 4 PM
top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या..
author img

By

Published : May 12, 2020, 4:05 PM IST

  • वाशिम - जिल्ह्यातील चांडस-पांगरखेडा रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 मे) दुपारी घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा - दुचाकी अपघातात एक जण ठार, वाशिम जिल्ह्यातील घटना

  • मुंबई - कोरोनाचा कहर मुंबईसह राज्यात वाढत आहे. अशात लॉकडाऊनमध्ये परदेशातून जे भारतीय नागरिक मुंबईत येत आहेत आणि राज्यातील जे मजूर-नागरिक स्थलांतर करत आहेत, त्या सर्वांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली गेली आहे.

सविस्तर वाचा - 'स्थलांतरितांसह परदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, अन्यथा परिस्थिती बिकट'

  • मुंबई - बृहन्मुंबई परिसरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आणीबाणी सदृृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगळवारी कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा - तत्काळ कामावर हजर व्हा; महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदेश

  • मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना डावलून इतरांना संधी देण्यात आल्याने त्याविषयीची नाराजी आणि त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले आहेत. काँग्रेसचे अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेले प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली नाराजी आज प्रकट केली आहे.

सविस्तर वाचा - सचिन सावंतांची पक्षाविरोधात जाहीर नाराजी..! ट्वीटरवरून काँग्रेस प्रवक्तेपद हटवले

  • अकोला - अमोल मिटकरींनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून निवडणुकीत जाहीरसभा घेतल्या. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात 'अमोल मिटकरींना आमदार करणारच'! असे सांगितले होते. त्यानुसार मिटकरींना उमेदवारी देण्यात आली. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे.

सविस्तर वाचा - शेतकऱ्याचा मुलगा ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी, अमोल मिटकरींना 'अशी' मिळाली संधी

  • मुंबई - राजकारण आणि समाजकारण यावर अनेकदा बेताल वक्तव्य करून कायम चर्चेत राहणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनाच्या संदर्भात पुन्हा एकदा एक आक्षेपार्ह हे ट्विट करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या काळात कोरोना आला असता तर कोणकोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार झाले असते, असा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.

सविस्तर वाचा - काँग्रेसच्या दोन माजी पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह ट्विट.. संबित पात्रांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

  • नवी दिल्ली - केजरीवाल सरकारने तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यातच आता दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनने १८ मे पासून सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. तिसरा लॉकडाऊन संपल्यानंतर ५५ दिवस बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा नव्याने सुरु होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा - दिल्लीत १८ मे पासून मेट्रो सुरू होण्याची शक्यता; प्रशासनाकडून सॅनिटायझेशन सुरू

  • वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाच्या प्रसारास चीन जबाबदार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केले आहे. कोरोनाचा उगमही वूहान प्रयोगशाळेत झाल्याचे ट्रम्प यांनी आरोप केला आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या परिस्थितीवरून एका चीनी-अमेरिकी वंशाच्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी उत्तर देण्याचे टाळत हाच प्रश्न तुम्ही चीनला का विचारत नाही, असा उलट प्रश्न केला.

सविस्तर वाचा - 'कोरोनाग्रस्तांचा आकडा का वाढला? हे मला नाही चीनला विचारा'

  • हैदराबाद - संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका जगभरातील पर्यटनाला बसला. रेल्वे, विमानसेवा बंद झाल्याने वाहतुक थांबली;आणि पर्यटन खोळंबले. त्यामुळे पर्यटनाशी निगडीत व्यवसाय प्रभावित झाले. सद्या जगभरात विविध ठिकाणी पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या भागात पर्यटन व्यवसायिक रेश्मा शिवलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी लंडन मधून संवाद साधला आहे. जाणून घेऊया त्यांचा 'कोरोनानुभव'...

सविस्तर वाचा - कोरोनानुभव...आगामी काळात 'क्वारंटाईन हॉलीडेज्'; पर्यटन व्यवसाय पर्यायी उपक्रमांच्या शोधात!

  • हैदराबाद : जग कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटाला तोंड देत असताना, कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गिलियड सायन्सेचेसचे विषाणू प्रतिबंधक औषध रेमडेसिवीर आणि अँटी इंफ्लेमेटरी / दाह विरोधी उपचारपद्धती 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचाराला मान्यता देण्यात आली असून त्याचा रुग्णावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरु केला असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) म्हटले आहे.

सविस्तर वाचा - 'कोविड-१९'च्या उपचारासाठी विषाणू प्रतिबंधक 'रेमडेसिवीर' आणि दाह विरोधी संयुक्त उपचाराच्या अभ्यासाला सुरुवात..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.