ETV Bharat / bharat

TOP 10@1 AM : दुपारी 1 पर्यंतच्या ठळक बातम्या... - महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या संख्या

देश-विदेशातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

today top ten news  today important news  today top headlines  आजच्या ठळक बातम्या  आजच्या महत्वाच्या बातम्या  आजच्या महत्वाच्या दहा घडामोडी  पत्रकार पांडुरंग रायकर न्यूज  महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या संख्या  पंतप्रधान मोदी ट्विटर अकाऊंट हॅक
TOP 10@9 AM : सकाळी ९ पर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Sep 3, 2020, 9:13 AM IST

Updated : Sep 3, 2020, 1:03 PM IST

मुंबई - राज्य शासनाने नुकतीच अनलॉक 4 ची घोषणा केली. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सरकारने मंदिर उघण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

वाचा सविस्तर - ...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई - सुशांत सिंह प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात सीबीआय आणि अंमली पदार्थ विरोधी पथक चौकशी करत असताना रोज नवीन माहिती समोर येत आहे. यामध्ये ड्रग लिंक्स देखील समोर आल्या आहेत. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने सिनेसृष्टीतील काही लोकांची चाचणी करण्याची मागणी केली होती. यामध्ये आता माजी खासदार निलेश राणे यांनी फक्त रणवीर आणि रणबीर यांची चाचणी कशाला, 'आदित्य ठाकरेंची देखील चाचणी करावी,' असे म्हटले आहे.

वाचा सविस्तर - 'आदित्य ठाकरे यांची देखील ड्रग्ज टेस्ट करा'

दुबई - आयपीएल २०२० स्पर्धेसमोरील अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जचे १३ सदस्य कोरोनाबाधित आढळले. यानंतर आता बीसीसीआयच्या मेडिकल टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. एएनआयने यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, अधिकाऱ्यांनी याची पूष्टी केली आहे. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, मेडिकल टीमच्या सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - BCCI च्या मेडिकल टीममधील सदस्याला कोरोनाची लागण; IPL अडचणीत?

नंदुरबार - गावात रस्ता नाही. मोठमोठे दगड, दऱ्या, खोरे पार करत, डोंगर चढून प्रवास करावा लागतोय. त्यात कोणी आजारी असेल तर त्याला खांद्यावर नाहीतर 'बांबूलन्स' (बांबूची झोळी)मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी अनेकांचा जीवही जातो. ही वाईट अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम भागातील गावांची...

वाचा सविस्तर - सातपुड्यात रस्तेच नाहीत, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन शिक्षणाने झाल्याचे चित्र आहे. मुंबईलगत असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण अजूनही पोहोचले नाही. एकीकडे पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य असल्याने दोन वेळच्या जेवणाची गरज भागवणे कठीण असताना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. परंतु यावर दिगंत स्वराज फाउंडेशन या संस्थेने नामी उपाय शोधलाय. शिक्षण देण्यासाठी त्यांनी 'बोलकी शाळा' नावाचा एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. काही दिवसांतच ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकही नीट मिळाली नव्हती, त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिकण्याची गोडी लावली. आज या प्रयोगाची दखल देशभरात घेतली जात आहे.

वाचा सविस्तर - दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी 'बोलकी शाळा', ऑनलाइन शिक्षणाला नामी पर्याय

वॉशिंग्टन - दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा पाकिस्तानचा कट, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी विशेष कारवाई १२६७च्या अंतर्गत पाकिस्तान हे करु पाहत होते. मात्र, आपल्या खोट्या दाव्यावर पुरेसे पुरावे दाखवणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. संयुक्त राष्ट्रांमधील देशाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असणारे टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

वाचा सविस्तर - 'संयुक्त राष्ट्रां'समोर पाक पुन्हा तोंडघशी; दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा कट उधळला

नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य देशात सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे. २०१९मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालात समोर आले आहे. यासोबतच, देशातील सरासरी शेतकरी आत्महत्यांचा दर कमी झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

वाचा सविस्तर - शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पुढे; फडणवीस सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर

अहमदनगर - पुणे येथील खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे उपचाराअभावी निधन झाले. उपचारासाठी कोपरगावपासून सुरू झालेला त्यांच्या समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम राहिला. सुरुवातीला कोपरगाव येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये रायकर गेले असता रुग्णालयाची मुजोरी समोर आली आहे. अगोदर पैसे भरा, त्यानंतरच उपचार करू, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णांची ससेहोलपट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकार असणाऱ्या रुग्णासोबत हा प्रकार घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

वाचा सविस्तर - पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरण : कोपरगावपासून सुरू झालेला समस्यांचा ससेमिरा पुण्यापर्यंत कायम

अमरावती - परतवाडा-धारणी मार्गावर भरधाव वेगात असणारी क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

वाचा सविस्तर - परतवाडा-धारणी मार्गावर क्रूझर झाडावर आदळली; तीन ठार, चौघे जखमी

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटला जोडलेले ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झालेले आढळून आले. हॅकर्सनी या अकाऊंटवरुन काही फेक ट्विट पोस्ट केल्या आहेत. क्रिप्टोकरंसी संबंधात चुकीची माहिती देणारे हे ट्विट्स आता हटवण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर - पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट झाले 'हॅक'!

Last Updated : Sep 3, 2020, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.