ETV Bharat / bharat

Top 10 @4pm : सायंकाळी ४ पर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news  today top ten news  दिवसभरातील ठळक घडामोडी  टॉप टेन न्यूज
Top 10 @4pm : सायंकाळी ४ पर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
author img

By

Published : Jun 6, 2020, 3:44 PM IST

मुंबई - अव्यवहार्य अशा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 27 महत्त्वपूर्ण कीटकनाशक बंदीचा प्रस्ताव महिनाभरात गुंडाळून ठेवण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. शेतकरी आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रखर विरोधासमोर केंद्र सरकार अखेर नरमले असून नैसर्गिक संकटाने बेजार झालेल्या शेतकर्‍याला कोरोना लॉकडाऊनमुळे फटका बसला असताना आणखी संकटाच्या खाईत जाऊ नये, यासाठी तूर्तास हा प्रस्ताव स्थगित केल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

वाचा सविस्तर - २७ कीटकनाशकांच्या बंदीवरील प्रस्तावावर केंद्र सरकारची स्थगिती?

नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील 69 हजार प्राथमिक शिक्षक भरतीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीनी सरकारला फटकारले आहे. संपुर्ण भरती प्रक्रियेत सरकारचा निष्काळजीपणा समोर आला आहे, असा आरोप त्यांनी योगी सरकारवर केला.

वाचा सविस्तर - उत्तरप्रदेशातील शिक्षकांची मेगाभरती वादात, प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा

रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषक सोहळा आज रायगड किल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळून अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची यथासांग पूजा केली.

वाचा सविस्तर - दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साधेपणाने साजरा ; कोरोना योध्याच्या केला सत्कार

चंद्रपूर/मुंबई - टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या एकूण निधीत तब्बल 67 टक्के कपात करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर - कोरोनाचा विकासकामांना संसर्ग; जिल्ह्यांच्या निधीत सरकारकडून 67 टक्के कपात

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठ्या दोन सैन्यांचे लेफ्टनंट जनरलपदावरील अधिकाऱ्यांची लडाखच्या पूर्वेकडी चीनच्या बाजूस असणाऱ्या चुशूल-मोल्दो या प्रांतात बैठक झाली. शनिवारी पार पडलेल्या या भेटीत भारत आणि चीन दरम्यान वाढलेल्या तणावाचे निवारण करण्यासाठी आवश्यक मुद्दे मांडण्यात आल्याचे समोर येते. दोन्ही देशांतील सीमावाद तीव्र होत असताना ही भेट एक अभूतपूर्व म्हटली पाहिजे. पहिल्यांदा पाहता ही भेट फक्त राजनैतिक वाटू शकते. मात्र यातील परिणामांना सामरिक पार्श्वभूमी आहे.

वाचा सविस्तर - भारत-चीन सीमावाद : राजनैतिक परिणामांसाठी सामरिक चर्चेचा मार्ग

मुंबई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगोच्या विमानाला अपघात झाला. आज सकाळच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे विमानतळावरील स्पाईसजेटची एक शिडी इंडिगोच्या विमानाच्या पात्याला धडकली. यामध्ये शिडीचे आणि विमानाच्या पात्याचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

वाचा सविस्तर - इंडिगोच्या विमानाला स्पाईसजेटच्या शिडीची धडक, विमानाचे नुकसान

मुंबई - कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने हा रुग्ण मानसिक तणावाखाली होता. या रुग्णाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णाने केलेली ही तिसरी आत्महत्या आहे.

वाचा सविस्तर - कोरोनाग्रस्त रुग्णाची नायर रुग्णालयात आत्महत्या; मुंबईत कोरोना रुग्णाची तिसरी आत्महत्या

पुणे - कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

वाचा सविस्तर - 'खासगी रुग्णालयांकडून होणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

मुंबई - टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा आज वाढवदिवस. तो आज ३२व्या वर्षात पदार्पण करत आहे. शांत, संयमी अशी ओळख असलेल्या अजिंक्यने फलंदाजी, क्षेत्ररक्षण यात भरीव कामगिरी केली आहे. तसेच त्याने काही सामन्यांत टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूंबद्दल जाणून घ्या खास गोष्टी...

वाचा सविस्तर - Birthday Special : ३२ वर्षांचा झाला अजिंक्य रहाणे, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...

इंदौर- एकता कपूरची नुकतीच प्रदर्शित झालेली एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेबसीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी इंदौरच्या साकेतनगर येथील नीरज यागणिक या व्यक्तीने एकता कपूर यांच्या विरोधात अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

वाचा सविस्तर - एकता कपूरच्या अडचणीत पुन्हा वाढ; इंदौरमध्येही गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.