ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - top news today

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

top ten news at 11 am
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...
author img

By

Published : Sep 19, 2020, 11:07 AM IST

नवी दिल्ली - केरळच्या एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या दोन कारवाईत त्यांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, बंदुकी, धारदार शस्त्रे यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना पश्चिम बंगाल-केरळ मधून अटक, एनआयएची कारवाई

कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे जवान लेह-लडाख सीमेवर तैनात होते. कित्येक दिवसांनी अवघ्या दोन महिन्यांची रजा त्यांना मिळाली होती. पण, सीमेवर तणाव वाढला आणि महिनाभरातच त्यांची रजा रद्द झाली. तातडीने हजर होण्याचा आदेश आला आणि ते कर्तव्यावर रूजू झाले. अशातच शुक्रवारी सचिन जाधव यांना वीरमरण आल्याची बातमी सकाळी स्थानिक प्रशासनाने दिली. दुसाळे गावच्या सुपूत्राला वीरमरण आले, या बातमीवर ग्रामस्थ आणि सचिनच्या मित्रांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. सीमेवर घुसखोरी करणार्‍या चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.

सविस्तर वाचा - चीन-भारत संघर्षात साताऱ्याचे जवान सचिन जाधव यांना वीरमरण

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली. याच्या विरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आलं आहे की, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्या सोबत झालेले गैरवर्तन असल्याचेही मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे.

सविस्तर वाचा - कंगनाच्या कार्यालयावरिल कारवाई योग्यच, तिची याचिका रद्द करावी - मुंबई महानगरपालिका

मुंबई - पंजाब अ‌ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सखोल तपास केला जात आहे. या तपासादरम्यान, ईडीने दिल्लीत एक मोठी कारवाई केली आहे. यात ईडीने १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

सविस्तर वाचा - पीमसी बँक घोटाळ्यात १०० कोटींची संपत्ती जप्त, ईडीची धडक कारवाई

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव मांडला आहे. महापौरांविरोधात अविश्वास ठराव भाजपाने मांडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र पालिकेच्या 128 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आले. त्यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव पालिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास लिहिणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा - मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव, एकही झाला नाही मंजूर

मुंबई - मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे आज निधन झाले. लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तारासिंग हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते.

सविस्तर वाचा - भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन

अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, १५ ऑगस्टला अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनी पुन्हा मैदानात पाहायला मिळेल. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ विजयी सुरूवात करण्यासाठी उत्सुक आहे.

सविस्तर वाचा - आयपीएलच्या रणसंग्रामाला आजपासून सुरूवात, सलामीला भिडणार मुंबई आणि चेन्नई

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आता कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक मध्ये ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा करण्यासाठी एकच टँकर उपलब्ध असून दुर्दैवाने टँकर नादुरुस्त झाला तर शासनाकडे सद्यस्थितीत पर्यायी व्यवस्था नसल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे इथली आरोग्यव्यवस्था एकाच ऑक्सिजन टँकरवर विसंबून असल्याची वास्तव परिस्थिती दर्शवणारा ई टीव्ही भारतचा ग्राउंड रिपोर्ट..

सविस्तर वाचा - धक्कादायक! नाशकात एकाच टँकरवर ऑक्सिजन पुरवठ्याची मदार; ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

अहमदनगर - अकोले विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार राजूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा - ग्रामपंचायत शिपायाला मारहाण; राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल

ठाणे - मुबंईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचा डब्बा आटगाव रेल्वे स्थानका नजीक रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत कुठलीही हानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र, रेल्वेचा डबा घसरल्याने या लोहमार्गावरील अत्यावश्यक रेल्वे सेवेची वाहतूक ठप्प झाली आहे.

सविस्तर वाचा - आटगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डब्बा घसरला, वाहतूक ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.