- नवी दिल्ली - अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करणार - सर्वोच्च न्यायालय
- नवी दिल्ली - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रियी उमटत आहेत. त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया
- मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्यावर शरद पवारांनी जाहीर टीका केली होती. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष समोर आला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे सूचक ट्वीट केले आहे.
सविस्तर वाचा- 'सत्यमेव जयते'...सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा 'पवार विरुद्ध पवार'?
- पाटणा - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आनंदी असल्याचे ट्वीट बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केले आहे. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा आहे. नक्कीच सुशांतला न्याय मिळेल. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रात गेलेल्या आमच्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी कैद्यासारखं ठेवलं, असा आरोप बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केली.
सविस्तर वाचा- #SushantSinghSuicide : आम्ही बरोबर होतो, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट - पोलीस महासंचालक
- कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
सविस्तर वाचा- 'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
- अहमदनगर -कोणतेही काम घोळत न ठेवता दादांची थेट निर्णय घेण्याची 'स्टाईल' आपल्याला भावते, असा साक्षात्कार त्यांनी आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवर भेटीचा फोटो टाकत व्यक्त केला आहे. मंगळवारी मुंबईत कार्यालयीन भेट घेत त्यांनी आपले काका असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आपले जाहीर मत व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा- अजितदादांच्या स्टाईलवर आमदार पुतण्या फिदा!
- पुणे - रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे. याची सोशल मीडिया ते राजकीय स्तरापर्यंत बरीच चर्चा होत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे, विनाकारण स्टेशनवर येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या प्रवक्त्याकडून देण्यात आले आहे.
सविस्तर वाचा- प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये; रेल्वेकडून स्पष्टीकरण
- पुणे - मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने ३५ दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केली. पुण्यातील भारती रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू होते. एका खासगी रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाला कोरोनाची बाधा झाली होती. पुढील उपचारासाठी त्याला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जन्माच्या वेळी त्याचे वजन फक्त १.८ किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता व ऑक्सिजन देण्याची गरज होती.
सविस्तर वाचा- मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाने ३५ दिवसानंतर केली कोरोनावर मात
- नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी दिली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. अभिजीत मुखर्जी यांच्या ट्वीटला त्यांनी दुजोरा न देता प्रकृतीत मोठा सुधार नसल्याचे सांगितले आहे. त्यांना फुप्फुसात संसर्ग असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सविस्तर वाचा- प्रणव मुखर्जींची प्रकृती स्थिर; तब्येत सुधारण्यासाठी व्हेंटिलेटरवर
- मुंबई - दिग्गज भारतीय माजी फलंदाज सचिन तेंडुलकरकडे बीएमडब्ल्यू, फेरारी, निसान जीटी-आर यांसारख्या जगातील सर्वोत्तम कार आहेत. त्यांची कारविषयीची आवड जगापासून लपलेली नाही. मात्र, व्यावसायिक क्रिकेटपटू झाल्यानंतर त्याने आपल्या पैशांसह घेतलेली पहिली गाडी अद्याप विसरला नाही.
सविस्तर वाचा- सचिनला परत हवीय त्याची पहिली गाडी!