- नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज सेना रुग्णालयात निधन झाले. याबाबत त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन माहिती दिली.
सविस्तर वाचा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
- नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांनी ८५ व्या वर्षी दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला आढावा...
सविस्तर वाचा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकीर्द
- मुंबई - राज्य सरकारने 'अनलॉक 4' साठी नियमावली जाहीर केली असून यात ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथिल झाली आहेत. आता प्रवास करताना ई-पासची गरज नाही. याशिवाय खासगी तसेच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा- ई-पास रद्द, राज्य सरकारचा निर्णय; अनलॉक 4 साठी नवी नियमावली जाहीर
- मुंबई - महानगरत सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) 1 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 45 हजार 805 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 655 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज (सोमवारी) 917 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 17 हजार 268 वर गेला आहे.
सविस्तर वाचा- मुंबईत कोरोनाच्या 1 हजार 179 नव्या रुग्णांची नोंद, 32 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) ११ हजार ८८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (३१ ऑगस्ट) ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा-महाराष्ट्रात ११ हजार ८८२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ
- पंढरपूर (सोलापूर) - मंदिरे खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपुरात आंदोलन केले जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरांसह नऊ जणांना मंदिरात प्रवेश देण्यात आला असून विठ्ठलासह रुक्मिणीचे मुखदर्शन देण्यात आले. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकात थांबवण्यात आले आहे. वाढती गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे.
सविस्तर वाचा- मंदिरे खुली करण्यासाठी वंचितचे पंढरपुरात आंदोलन; प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठलाचे घेतले मुखदर्शन
- जळगाव - मागील 10 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर मंगळवारी (1 सप्टें) अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महापालिका प्रशासनाने विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून शहरात 28 ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती संकलनासाठी स्टॉल्स उभारले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून देखील मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी घरगुती मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा-जळगावात गणपती बाप्पाच्या निरोपाची तयारी पूर्ण
- पुणे - पुण्यातील प्रसिद्ध बाबा भिडे पुलाजवळ तरुणींच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन गटातील अंदाजे 10-12 तरुणींनी एकमेकींना केस धरून लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. ही फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी नदीपात्राजवळ बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.
सविस्तर वाचा-पुण्यातील बाबा भिडे पुलाजवळ तरुणींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी
- मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटीश साहसी बेयर ग्रील्सने त्याला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा कसा दिला हे सांगितले आहे.
सविस्तर वाचा- बेयर ग्रील्सने अक्षय कुमारला पाजला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा
- मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामुळे आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात बदल केला जाण्याची शक्यता आहे. सलामीचा सामना मुंबई आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होण्याची शक्यता आहे, असे संकेत मिळत आहेत.
सविस्तर वाचा- IPL च्या वेळापत्रकात बदल? सलामीचा सामना मुंबई आणि बंगळुरू यांच्यात रंगण्याची शक्यता