- गुंटूर - कुष्ठरोग्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना स्पर्श करण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. या हातांवर भिक्षा मागण्याची वेळ आली होती. मात्र, आता याच हातांनी तयार केलेल्या वस्तू परदेशात निर्यात केल्या जात आहेत.
सविस्तर वाचा- ईटीव्हीचा विशेष रिपोर्ट : नशिबाला आव्हान देणाऱ्या कुष्ठरोग्यांची कहानी...
- हैदराबाद - भारतात कोरोनाचा कहर सुरू असून जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशामध्ये एकूण रुग्णांची संख्या ४१ लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमध्ये ४० लाख ४१ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तेथे ६० लाखांपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
सविस्तर वाचा- भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
- मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईत कोरोनाचे १७०० रुग्ण दररोज आढळून येत होते. पालिकेने ही संख्या ९०० ते १२०० पर्यंत आणली होती. मात्र सप्टेंबरच्या सुरूवातीला रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी १६२२, गुरूवारी १५२६, शुक्रवारी १९२९ तर शनिवारी १७३५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले.
सविस्तर वाचा- गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाच्या १९१० रुग्णांची नोंद, ३७ जणांचा मृत्यू
- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या आपल्या कुटुंबात रमले आहेत. आपल्या नातवंडासोबत वेळ वाया घालवत असताना विजय सुळे या नातूसोबत फेरफटका मारताना त्यांनी विजयच्या हाती गाडीचे स्टेरिंग दिले. विशेष म्हणले नव्यानेच गाडी चालवणाऱ्या आपल्या नातवाला पवारांनी बाजूला बसून ड्रायव्हिंग कशी करावी, यासाठीचे धडेही दिले. यामुळे पवार आपल्या नातवाच्या हाती गाडीसोबतच राजकीय 'स्टेरिंग'ही हाती देण्यासाठीचे धडे देतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा- शरद पवारांचे 'स्टेरिंग' नातवाच्या हाती; सुप्रिया सुळेंनी शेअर केली पोस्ट
- सांगली - कुटुंबाला कोरोना झाल्यामुळे वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सांगलीतील दुधगाव येथे घडला आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कोरोनाग्रस्त मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव येथील उपाध्ये कुटुंबावर ही शोककळा पसरली आहे.
सविस्तर वाचा- धक्कादायक! कुटुंबाला कोरोना झाल्याने वडिलांची आत्महत्या, तर मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू
- सातारा - बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तब्बल एक कोटीची फसवणूक करून वर्षभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. निलेश महादेव कोकणी व सचिन केपन्ना तरपदार (वय - 34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सविस्तर वाचा- नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची 1 कोटीची फसवणूक; सहा तालुक्यांतील युवकांना गंडा
- मुंबई - मुंबईत आग लागली, घर, इमारत किंवा झाड कोसळले की बचावासाठी अग्निशमन दलाला बोलावले जाते. मात्र, मुंबईकरांच्या बचावासाठी असलेल्या या दलात तब्बल 25 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
सविस्तर वाचा- मुंबई अग्निशमन दलातील 25 टक्के पदे रिक्त, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती
- नवी दिल्ली : ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनावरील लसीची क्लिनिकल चाचणी या आठवड्यात सुरू होणार होती. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) याठिकाणी ही चाचणी होणार होती. मात्र, सुरक्षा मंजुरीमुळे ही चाचणी आता एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.
सविस्तर वाचा- सुरक्षा मंजुरीमुळे ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी लांबणीवर
- नवी दिल्ली - जागतिक उत्पादन परिसंस्थेला या गोष्टीची जाणीव होत आहे, की भारत एक मोठे उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही विशेषतः भारतात गुंतवणूक करण्याकडे मोठ्या कंपन्या भर देत आहेत, असे मत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी व्यक्त केले. ते अनिवासी बिहारी लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते.
सविस्तर वाचा- एक मोठे उत्पादन केंद्र म्हणून देशाची ओळख निर्माण होत आहे - रवीशंकर प्रसाद
- नवी दिल्ली - मागील चार महिन्यांपासून भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. पूर्व लडाखमधील अनेक भागांत चीनकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत लष्कराची सज्जता अंत्यत महत्त्वाची आहे. सीमेवर तणाव असतानाच लष्कराने सीमा भागातील रस्ते बांधकामाला वेग दिला आहे.
सविस्तर वाचा- भारत-चीन तणाव: सीमा भागातील रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू, चीनला रोखण्यास लष्कर सज्ज