ETV Bharat / bharat

TOP 10 @11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

author img

By

Published : Sep 7, 2020, 11:00 AM IST

सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी
Top Ten At 11 AM
  • मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगल समोर आला आहे. याप्रकरणी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते. आज तिला पुन्हा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले असून तिची चौकशी सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा- रिया चक्रवर्तीची आज एनसीबीकडून पुन्हा चौकशी

  • पुणे - मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने शहरात भीषण अपघात घडला. भरधाव वेगात जाणारी ही गाडी थेट एका दुकानात शिरल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तसेच पाच जण जखमी झाले. रविवारी दुपारच्या सुमारास बालेवाडीतील ममता चौकात हा अपघात झाला.

सविस्तर वाचा- मद्यधुंद सेवानिवृत्त पोलिसाची भरधाव कार शिरली पंक्चरच्या दुकानात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

  • मुंबई - ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तापमानही वाढले होते. मात्र किनारपट्टी भागासह पुणे, सतारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरलाय.

सविस्तर वाचा- मुंबईसह उपनगरात मुसळधार... विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

  • मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह ४० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, विद्यापीठ परीक्षा, कोरोना, दूध प्रश्न पेटणार

  • सातारा - बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तब्बल एक कोटीची फसवणूक करून वर्षभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. निलेश महादेव कोकणी व सचिन केपन्ना तरपदार (वय - 34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा- नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची 1 कोटीची फसवणूक; सहा तालुक्यांतील युवकांना गंडा

  • सोलापूर - शहरातील निलम नगर परिसरात विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार राहतात. घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे सरकारनं सुरू केलेले ऑनलाइन शिक्षण घेणार तरी कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. पण, याच परिसरातील शिक्षकाने भिंती रंगवून या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देणं सुरू केलंय.

सविस्तर वाचा- सोलापुरात मोबाइलविनाही शिक्षण, कामगारांच्या मुलांसाठी उभारलीय शैक्षणिक भिंत

  • पुणे - राज्य सरकारने नुकतीच जिल्हाबंदी उठवली असून लोणावळा शहरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या पर्यटकांनी तसेच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याने लोणावळा पोलिसांनी एकाच दिवसात 2 लाख 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे, पर्यटन बंदीचे उल्लंघन, अशा एकूण 405 जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली.

सविस्तर वाचा- जिल्हाबंदी उठल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; 405 जणांवर कारवाई

  • नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ८०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४२ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा- देशात पुन्हा ९० हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद; जागतिक आकडेवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

  • मनाली (हिमाचल प्रदेश) - नागपूरचा धावपटू कायरेन डिसूजा याने मनालीतील १३ हजार फूट उंट हामटा आणि रोहतांग पर्वतांमधील दरी १९ तासात पार करून नवीन विक्रम केला आहे. डिसूजाने रात्री १२ वाजता मनालीहून धावायला सुरुवात केली होती. सकाळी डिसूजा १३ हजार फूट उंच हामटा पर्वतावर पोहोचला. त्यानंतर हामटाहून पूर्ण दिवस धावत रोहतांग पार करून रविवारी संध्याकाळी डिसूजा मनालीत पोहोचला. मनालीत उपविभागीय दंडाधिकारी रमन घरसंगी यांनी डिसूजाचे स्वागत केले. दरम्यान, हा विक्रम करताना डिसूजाची टीम मदतीला त्यांच्यासोबत होती.

सविस्तर वाचा- नागपूरचा धावपटू कायरान डिसूजाने हिमाचल प्रदेशमध्ये रचला नवा विक्रम

  • मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'वडापाव'वर असलेले प्रेम सर्वांनाच माहिती आहे. यासंबंधी त्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो वडापाव बनवताना दिसत आहे. तसेचल यावेळी अपेक्षित नसलेले पाहुणेही दाखल झाले आहेत, ते म्हणजे मांजर.

सविस्तर वाचा- सचिन तेंडुलकरने बनवलाय वडापाव, शेअर केले फोटो

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.