- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी (एनईपी) संबंधित उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवर आधारित संमेलनात भाषण करतील. पंतप्रधान कार्यालयद्वारे जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. हे संमेलन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे केले जात आहे.
सविस्तर वाचा - NEP 2020 : पंतप्रधान मोदींचे उच्च शिक्षण धोरणावर उद्घाटनाचे भाषण
- मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज गुरुवारी अकरा हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आजही १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा - कहर सुरूच.. राज्यात गुरुवारी ११ हजार ५१४ नवे कोरोना रुग्ण, ३१६ मृत्यू
- कोल्हापूर - राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आणि ६ आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता उघडले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची मुसळधार बरसात सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
सविस्तर वाचा - राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पातळीत होणार वाढ
- मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सीबीआयकडून 'या' संशयित आरोपींवर गुन्हा दाखल
- पुणे - शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशोत्सव साध्यापणाने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आज (गुरुवार) झालेल्या बैठकीत काही नियम अटी घालून दिल्या गेल्या आहेत. पुण्याचा गणेशोत्सव भव्य देखाव्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी पुण्यात कोणत्याही गणपती मंडळासमोर देखावे उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज (गुरुवार) गणपती मंडळ, महापालिका अधिकारी, महापौर यांसह पोलीस अधिकारी यांची पुण्यातील गणेशोत्सवाबाबत एकत्रित बैठक पार पडली.
सविस्तर वाचा - 'पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुयात'
- चेन्नई - लेबनॉनची राजधानी बैरुत येथे बंदरावर झालेल्या शक्तीशाली स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. बंदरावर ठेवलेल्या धोकादायक अशा अमोनियम नायट्रेट या केमिकलचा स्फोट झाल्याने शेकडो जण ठार झाले असून हजारो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदरांची प्रशासनाकडून झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान, तामिळनाडूतील चेन्नई शहराजवळील मनाली या ठिकाणी गोदामात तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेट हे धोकादायक केमिकल साठवून ठेवल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वाचा - बैरुत स्फोटानंतर भारतातल्या बंदरांची झाडाझडती; 'या' ठिकाणी 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा
- मुंबई - सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले? असा विचार आपण केला, तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली.
सविस्तर वाचा - 'गुगल क्लासरूम सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान'
- लंडन - बँकेतील घोटाळा आणि अवैध संपत्तीप्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि अवैध संपत्ती प्रकरणी आरोपी नीरव मोदी याला ब्रिटनच्या एका न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर केले जाणार आहे.
सविस्तर वाचा - नीरव मोदीच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ
- वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाबाबत चुकीची माहिती देणे महागात पडले आहे. ऐन निवडणूक प्रचारात ट्विटरने ट्रम्प यांच्या टीमचे अकाउंट तात्पुरते बंद केले आहे. तर फेसबुकनेही चुकीची माहिती देणारा ट्रम्प यांचा व्हिडिओ काढून टाकला आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाबाबत चुकीची माहिती देणे महागात; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमचे ट्विटर अकाउंट बंद
- कोल्हापूर - जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची वाटचाल धोकादायक स्थितीकडे सुरू आहे. सध्या नदीची पातळी ४२.५ फुटांवर आहे. धोकादायक पातळी गाठण्यासाठी केवळ ५ इंच पातळी बाकी आहे. या संपूर्ण परिस्थितीची दृश्य ईटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तौफिक मिरशिकारी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत.
सविस्तर वाचा - पंचगंगा धोकापातळीच्या जवळ, पाहा ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापूरची पूरस्थिती