- मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत पेडणेकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना 'पॉझिटिव्ह'
- मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर काल (बुधवार) अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई केली होती. काल(बुधवारी) या ठिकाणी पोहोचल्यानंतर कंगनाने झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केले होते. आज कंगनाची बहीण रंगोली ही पालिकेने तोडफोड केलेल्या मणिकर्णिका कार्यालयात येऊन गेली.
सविस्तर वाचा - कंगनाची बहीण रंगोलीने केली 'मणिकर्णिका' कार्यालयाच्या तोडफोडीची पाहणी
- मुंबई - शिवसेना आणि कंगना रणौतचा वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. बुधवारी कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी बीएमसीने कारवाई करत तिचे घराचे अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत शिवसेनेला बाबरसेनेची उपमा दिली होती. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नसून कंगनाने आज शिवसेनेला थेट सोनिया सेना म्हणत पुन्हा टीका केली आहे. यावर आता शिवसेनेकडूनही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा - सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना
- नवी दिल्ली - बहुप्रतीक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा संपन्न झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा - राफेलचा आज हवाईदलात अधिकृतपणे समावेश, अंबाला हवाईतळावर कार्यक्रम संपन्न
- श्रीनगर - आज जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कुपवाडा येथून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 7 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. तसेच संबधित परिसरामध्ये शोधमोहिमेसाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
सविस्तर वाचा - कुपवाडामधून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक
- मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सुरू असताना या प्रकरणी ड्रग्ज सिंडिकेट समोर आले. तपासादरम्यान विविध संशयित आरोपी ड्रग्जचे सेवन करत असल्याचे देखील स्पष्ट झाले. याबाबत अधिक चौकशी करण्यात आली.
सविस्तर वाचा - रिया व शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी
- हैदराबाद - आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण मंडळा(आयएनसीबी)च्या २००७मधील अहवालानुसार, अमली पदार्थांच्या वापरात किंवा व्यवहारात प्रसिद्ध व्यक्तींच्या सहभागाचा समाज जीवनावर मोठा परिणाम होतो. समाजातील एक मोठा गट प्रसिद्ध व्यक्तींचे विविध गोष्टींसाठी अनुकरण करतो. मात्र, जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अमली पदार्थांच्या अधिन झालेले दिसतात.
सविस्तर वाचा - अमली पदार्थ सेवन अन् बॉलिवूड कलाकारांचा संबंध...
- मुंबई- कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद आता चांगलाच पेटला आहे. कंगनाने मुंबईला पाकिस्तान संबोधण्यासह मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाबद्दल केलेल्या ट्विटवरून हा वाद चांगलाच टोकाला गेला. कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर संतप्त झालेल्या कंगनाने वाटेल तसा निशाणा साधत शिवसेनेला बाबरची सेना देखील म्हटलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही ”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. त्यामुळे बाबर आणि बाबरी बद्दल तिने न बोललेच बरे असे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सविस्तर वाचा - बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर
- मुंबई - कुठलीही योजना कागदावर चांगलीच असते. तिचा उद्देशही चांगलाच असतो. प्रश्न असतो तो पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीचा. त्यात जेव्हा गडबड होते तेव्हा त्यावरून केलेली बडबड ‘पोकळ’ आणि खर्च ‘वायफळ’ ठरतो. जलयुक्त शिवार योजनेचे तेच झाले. ‘कॅग’ने मारलेल्या ताशेऱ्यांचा तोच अर्थ आहे. अंमलबजावणी प्रभावी झाली असती तर राज्यातील शिवारे खऱ्या अर्थाने ‘जलयुक्त’ झाली असती, असा टोला शिवसेनेने मुखपत्र सामनामधून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
सविस्तर वाचा - पोकळ आणि वायफळ बडबडीने ‘जलयुक्त’चा फुगा फुटला!
- अबूधाबी - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्ये कसून सराव करत आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात १९ सप्टेंबरला सलामीचा सामना रंगणार आहे. यादरम्यान, मुंबईच्या संघातील खेळाडू सराव सत्रात भरपूर मेहनत घेत आहेत. सराव सत्रात कर्णधार रोहित शर्मा जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. त्याने टोलावलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेला.
सविस्तर वाचा - पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ