ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 'या' ८ जागांवर देशाचे लक्ष; हे दिग्गज रिंगणात - Nitin Gadkari

नागपूरातून नितीन गडकरी, हैदराबाद मधून असदुद्दीन ओवैसी तर, एच. डी. देवेगौडा सारखे मोठे नते रिंगणात आहेत. यांच्यावर सर्व देशाचे लक्ष लागून आहे.

हे नेते रिंगणात उभे आहेत
author img

By

Published : Apr 11, 2019, 12:24 PM IST

हैदराबाद - देशभरात लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. या निवडणुका ७ टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये २० राज्यांच्या ९१ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये अनेक अशा जागा आहेत ज्यावर देशभराचे लक्ष लागून आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, अससुद्दीन ओवैसी आणि चिराग पासवान सारखे मोठे नेतेही रिंगणात आहेत.

नागपूर, महाराष्ट्र -

Gadkari
नाना पडोले आणि नितीन गडकरी
महाराष्ट्रातील या जागेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. कारण या जागेवरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी नेते नाना पटोले काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे येथे दोन्ही उमेदावारांमध्ये जोरदार टक्कर आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र -

Dhanorkar
हंसराज अहीर आणि सुरेश धानोरकर
चंद्रपूर ही लोकसभा निवडणुकांमधली महत्वाची जागा आहे. येथे भाजपने हंसराज अहिर यांना तिकीट दिली आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश धानोरकर निवडणूक लढत आहेत. अहिर यांनी २०१४मध्ये येथून निवडणूक जिंकलेली आहे. तर दोन्ही उमेदवारांमध्ये 'कांटे की टक्कर' आहे.

मुजफ्फर नगर, उत्तर प्रदेश -

ajay Singh
संजिव बाल्यान आणि अजय सिंह
पश्चिम उत्तर प्रदेशात हा मतदार संघ अत्यंत महत्वाचा मानला जातो. यामध्ये भाजपचे संजिव बालियान आणि सपा-बसप आणि रालोदचे चौधरी अजित सिंह मैदानात आहेत. या दोघांमध्ये चुरशीची लढत असून बालियान यांचे सर्वस्व लागून आहे. तर, अजित सिंह यांची ही पारंपारिक जागा आहे. त्यामुळे तेही संपूर्ण ताकद लावून निवडणूकीच्या मैदानत उतरले आहेत. या जागेवरुन कोण निवडणून येणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

गजियाबाद, उत्तर प्रदेश -

Dolly Sharma
डॉली शर्मा आणि जनरल वी. के. सिंह
उत्तर प्रदेशच्या या मतदार संघामध्ये देशाचे विशेष लक्ष लागून आहे. या मतदार संघामधून काँग्रेसने डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी मोठा रोड शो केला होता. मात्र, यांच्या विरोधात भाजपचे खासदार वी. के. सिंह मैदानात आहेत. तर सपा-बसप आणि रालोद यांच्या घाडीतून सुरेश बंसल रिंगणात आहेत. त्यामुळे येथे त्रिशंकू लढत सुरू आहे.

गया, बिहार -

Manjhi
जीतन राम मांझी विजय कुमार मांझी
बिहारच्या गया लोकसभा मतदार संघात एनडीए पक्षांपैकी जेडीयूला जागा मिळालेली आहे. येथे त्यांनी विजय कुमार मांझी यांना उमेदवारी दिली आहे. तर, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी मैदानात आहेत. त्यामुळे ही जागा अत्यंत महत्वाची झाली आहे. मागच्या वेळी येथे भाजपचे हरि मांझी यांनी निवडणूक जिंकली होती.

तुमकुर, कर्नाटक -

Gowda
एच. डी. देवेगौडा आणि जी. एस. बसवराज
कर्नाटकाच्या या जागेवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे जी. एस. बसवराज रिंगणात आहेत. काँग्रेस आणि जेडीएसने येथे आघाडी केल्यामुळे देवेगौडा यांची स्थिती मजबूत आहे.

हैदराबाद, तेलंगणा -

Owaisi
असदुद्दीन ओवैसी आणि डॉ. भगवंत राव
तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने डॉ. भगवंत राव यांना उतरवले आहे. मागच्या वेळी या जागेवरून ओवैसी प्रचंड बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी या जागी कोण बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

नैनीताल, उत्तराखंड -

Rawat
हरिश रावत आणि अजय भट्ट
उत्तराखंडच्या या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे दिग्गज नेते हरिश रावत निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने अजय भट्ट यांना मैदानात उतरवले आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकांच्या आकड्यांवर एक नजर -
देशातील या ९१ जागांवर भाजपने ३२ जागा आपल्या पारड्यात टाकल्या होत्या. तर काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला होता. याव्यतिरिक्त स्थानिक आणि स्वतंत्र उमेदवारांनी ५२ जागांवर कब्जा केला होता. भाजपने उत्तर प्रदेशातील सर्व ८ जागा हस्तगत केल्या होत्या. तर, महाराष्ट्रातील ७ पैकी ५ जागांवर भाजप जिंकली होती. असममध्ये ५ पैकी ४ आणि बिहारमधअये ४ पैकी ३ जागांवर भाजपने विजय संपादन केले होते.

या २० राज्यांमध्ये निवडणूक
आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, असम, तेलंगणा, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, छत्तीसगड, मणिपूर, मिजोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा, अंडमान आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.